शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाहक-चालकांचे प्रवाशांशी साटेलोटे; एस.टी.ला तोटा !

By admin | Updated: March 30, 2015 00:41 IST

लातूर : निलंगा आगारातील नऊ मार्गावरील बससाठी १८४ चालक व १८६ वाहकांच्या कायम ड्युट्या होत्या

लातूर : निलंगा आगारातील नऊ मार्गावरील बससाठी १८४ चालक व १८६ वाहकांच्या कायम ड्युट्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहक- चालक व प्रवाशांची चांगली ओळख झाली होती़ प्रवाश्यांची आणि चालक-वाहकांची जवळीक एस.टी.चे उत्पन्न ढापणारी असल्याचे लक्षात येताच विभाग नियंत्रकांनी या मार्गावरील वाहक-चालकांच्या ड्युट्या बंद केल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लाखाची भर पडली आहे़निलंगा आगारातील वाहक काही प्रवाशांचे कमी पैसे घेवून प्रवाशांना इच्छित ठिकाणी विनातिकीट प्रवासाची सेवा देत होते़ त्यामुळे प्रवासी व एसटीच्या कर्मचाऱ्यात साटेलोटे सुरू असल्याची चर्चा प्रवाशातून ऐकावयाला मिळत होती़ या प्रक्रियेमुळे ‘एसटीचे साहेब खुप चांगले आहेत’ अशी प्रतिक्रिया प्रवाशातून ऐकायला मिळत होती़ ही बाब मार्ग तपासणी पथकालाही कळाली़ त्यामुळे निलंगा-औराद शहाजानी हालकी-सुगाव एम़एच- २४- ८८३४ या बसची तगरखेडा थांब्यावर तपासणी करताच या बसमधील वाहकाने एकूण प्रवाशापैकी २६ प्रवाशांना तिकीट दिले तर १३ प्रवाशांचे तिकीट न देताच कमी पैशात प्रवाशांना सेवा दिल्याचे मार्गतपासणी पथकाच्या लक्षात आले़ याबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी वाहकास जाब विचारताच वाहकांच्या बाजूने तेथील कर्मचारी अधिकाऱ्याच्या अंगावरही आले़ हा प्रकार लक्षात येताच निलंगा आगाराअंतर्गत हलसी तुगाव, उदगीर, औराद शहाजानी, उजेड, अजनी, कासरसिरसी या मार्गावरील बारा वाहक-चालकांच्या फिक्स ड्युट्या बंद करून रूटींग पध्दतीने ड्युट्या सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)