सिल्लोड : प्रवासी उतरविण्यासाठी बस उभी केल्याच्या कारणावरून बसच्या पाठीमागून येणार्या इंडिका कारमधील चार जणांनी बसचालक व महिला वाहकास मारहाण के ल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील भराडी नाक्यावर घडली. याप्रकरणी इंडिका कारमधील अज्ञात ४ जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिल्लोड आगाराची बस (क्र. एम.एच.-२० डी-५५६१) चालक सय्यद अली सय्यद यासीन (५६) भराडीकडून सिल्लोडकडे घेऊन येत होते. भराडी नाक्याजवळ प्रवासी उतरविण्यासाठी चालकाने बस थांबवली. यादरम्यान बसच्या पाठीमागे इंडिका कार (क्र. एम.एच.-२० सीएस ०९१८) येत होती. आमच्या गाडीसमोर गाडी का उभी केली म्हणून इंडिका कारमधील चार जणांनी चालकाला चापट-बुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा येथील चालक व वाहकांनी तीव्र निषेध केला आहे. (वार्ताहर) वाहक महिला असतानाही आरोपींनी उगारला हात महिला वाहक सुनीता गोरे आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी महिला वाहकासही मारहाण क रीत सरकारी कामात अडथळा आणला व बसला दगड मारून काच फोडून नुकसान केले. यानंतर आरोपी इंडिका कारमध्ये बसून पळून गेले. चालक सय्यद अली यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाहक, चालकास मारहाण
By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST