शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

७०० कोटींच्या भूखंडावर कब्जा!

By admin | Updated: July 8, 2014 01:05 IST

औरंगाबाद : महापालिका शहरातील स्वमालकीच्या भूखंडांवर सिडको-हडको, टीव्ही सेंटर येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा पॅटर्न शहरात इतर ठिकाणी राबविण्याच्या तयारीत आहे.

औरंगाबाद : महापालिका शहरातील स्वमालकीच्या भूखंडांवर सिडको-हडको, टीव्ही सेंटर येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा पॅटर्न शहरात इतर ठिकाणी राबविण्याच्या तयारीत आहे. मात्र, मनपाच्या अंदाजे ७०० कोटी रुपयांच्या भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. ते भूखंड त्यांच्या तावडीतून अतिक्रमणमुक्त करावे लागतील. त्यानंतर पालिकेचा उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुल बांधण्याचा पॅटर्न यशस्वी होईल. बीओटीऐवजी भाडेकरारावर भूखंड विकसित करून तेथे व्यापारी संकुल बांधण्याची मनपाची संकल्पना असून, मोक्याच्या ठिकाणावरील भूखंडांचा शोध सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु अतिक्रमण हटविण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. मनपाचे बीओटीवरील बहुतांश प्रकल्प कागदावरच आहेत. जे प्रकल्प झाले त्यातून पालिकेला फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भाडेकरारावर गाळे बांधून करार करण्याचा प्रकल्प आणला. १२ कोटी ५० लाख रुपयांच्या त्या प्रकल्पातून ८ कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळणार आहे.सर्वाधिक ‘अ’ प्रभागातील आरक्षित भूखंड अतिक्रमित झाले आहेत. ‘अ’ प्रभागात जुने शहर येते. त्यानंतर ‘ब’ प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत. सिडकोचा भाग या प्रभागात येतो. ‘ड’ प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत. ती मोहीम कागदावरचमनपा मालकीच्या ५२९ पैकी ६३ भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त किशोर बोर्डे, उपअभियंता बी.के. गायकवाड व कर्मचारी एप्रिल-मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून मोहीम राबविणार होते. मात्र, त्या मोहिमेला काही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे मनपाला आधी अतिक्रमित भूखंड भूमाफियांच्या तावडीतून सोडवून घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर व्यापारी संकुल बांधण्याची संकल्पना पूर्ण होईल. प्रभागनिहाय भूखंडप्रभाग भूखंड अतिक्रमित भूखंडअ०८५१९ब०९६११क०३६०९ड०६११५ई११९०८फ१३२०१एकूण५२९६३कशामुळे झाले अतिक्रमण१९९२ च्या विकास आराखड्यात शहरात १८ खेडी घेण्यात आली होती. त्यावेळी ६० वॉर्ड होते. २००२ पर्यंत वाढणाऱ्या शहराचा विचार करून शाळा, आरोग्य केंद्र, क्रीडांगण व इतर समाजकल्याणकारी उपक्रमांसाठी ५२९ भूखंड आरक्षित करण्यात आले. त्या भूखंडांवर मनपाने मालकीचा बोर्डही लावला नाही. शिवाय अनेक भूखंडांची मालकीही मनपाच्या नावे नाही. याचाच फायदा घेत भूमाफियांनी अतिक्रमण करीत आरक्षित जागेवर कब्जा केला. त्याला पालिकेतील काही अधिकाऱ्यांनीदेखील मदत केली आहे.