शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप;कामकाज ठप्प

By admin | Updated: April 22, 2015 00:38 IST

जालना : ‘बीएसएनएल कंपनी वाचवा, देश वाचवा’ या प्रमुख मागणीसाठी बीएसएनएलमधील १९ संघटना एकत्र आल्या असून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून दोन दिवसांचा संप सुरू केला आहे

जालना : ‘बीएसएनएल कंपनी वाचवा, देश वाचवा’ या प्रमुख मागणीसाठी बीएसएनएलमधील १९ संघटना एकत्र आल्या असून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून दोन दिवसांचा संप सुरू केला आहे. त्यामुळे बीएसएनएल सेवेच्या कामावर परिणाम झाला आहे.आज पहिल्याच दिवशी संपकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या संपामुळे कार्यालयास दरवाजा लावण्यात आलेला होता. याबाबत कर्मचारी संघटनेचे एस.बी. वाखारकर म्हणाले की, पारदर्शकता आणि विश्वासार्हता यांच्या कसोटीवर उतरणारी ही सार्वजनिक कंपनी सरकारच्या व व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या ४ वर्षांपासून सातत्याने तोट्यात जात आहे. बीएसएनएल ब्राँडबॅन्ड व मोबाईल इंटरनेटची आज प्रचंड मागणी असून सुद्धा कंपनीकडे विस्ताराची कोणतीही योजना नाही. उलट अस्तित्वात असलेल्या लॅँडलाईनची मेन्टेनन्ससाठी लागणारे साहित्य व मोबाईल सेवेसाठीचे टॉवर्स, एक्सचेंज, केबल, ड्राप वायर, स्पेअर पार्टस इ. वेळेवर व पुरेशा प्रमाणात दिले जात नाही. परिणामी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. व्ही.व्ही. साबळे म्हणाले, कव्हरेज, कनेक्टीव्हीटी तसेच इंटरनेट स्पीड अपेक्षेनुसार देण्यात येत नाही. नाईलाजाने ग्राहकांना खाजगी कंपन्यांची महागडी व छुपे चार्जेस असलेली सेवा घेणे भाग पडते. बीएसएनएलच्या विस्ताराच्या योजना जाणूनबुजून प्रलंबीत ठेवण्यात येतात. आवश्यक सरकारी भांडवल गुंतवणूक केली जात नाही. ग्राहकांच्या गरजेनुसार निर्णय घेण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ व प्रशासकीय स्वायतत्ता बीएसएनएलला नाकारली जात आहे.ग्रामीण भागातील तोट्यातल्या सेवांची भरपाई नाकारुन एडीसी चार्जेस, लाईसेन्स फीस सवलत ई. काढून घेतल्याने बीएसएनएलचा विकास ठप्प झालेला आहे. स्पेक्ट्रमचे ७००० हजार कोटी रु. तसेच काल्पनिक कर्जापोटी वसूल करण्यात आलेले १४ हजार कोटी रु. ई. मार्गानी बीएसएनएलची सर्व गंगाजळी सरकारने काढून घेतल्याने कंपनीची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सर्व बाजूंनी बीएसएनएलची कोंडी करुन खाजगी कंपन्यांना रान मोकळे करुन दिले जात आहे. बीएसएनएलचे केबल, टॉवर्स, जमिनी व मालमत्ता यांच्या वेगवेगळ्या उपकंपन्या स्थापन करुन संपूर्ण संचार सेवा खाजगी कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या संचार क्षेत्राचे खाजगीकरण करणे ही ऐतिहासिक चूक ठरेल असा दावा करून बीएसएनएलमधील सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांनी आवाज उठवला आहे. यावेळी एस. बी. वाखारकर, व्ही. व्ही. साबळे, एस. बी. राठी, के. पी. कुलकर्णी, जी. आर. वावळे आदी उपस्थित होते. बीएसएनएलचा तोटा करणाऱ्या ग्रामीण भागातील सेवांची तूट भरुन काढा४आवश्यक उपकरणे त्वरित उपलब्ध करुन द्या.४बीएसएनएल सेवांच्या विस्तारासाठी आर्थिक सहाय्य.४बीएसएनएल-एमटीएनएल एकत्रीकरण करु नका.४बीबीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलिनीकरण करा४कोणत्याही सहाय्यक टॉवर कंपनीचा प्रस्ताव रद्द करा.४बीएसएनएलची मालमत्ता बीएसएनएलच्या नावे करा.४स्पेक्ट्रम चार्जेस त्वरित परत करा.४डिलॉइट कमिटीच्या कामगार विरोधी शिफारशी रद्द करा.४बीएसएनएलला मोफत स्पेक्ट्रम उपलब्ध करुन द्या४नवीन कर्मचाऱ्यांची भरती करा४बीएसएनएलची फोरजी सेवा सुरु करा.४७८.२ टक्के ग्रांट