बिलोली: शहरातील कुंडलवाडी मार्गावर असलेल्या देशी दारू दुकानाच्या परिसरात एका पारधी तरूणाचा खून झाला़ सदरील घटना सोमवारी सकाळी ११़३० वाजता घडली़कुंडलवाडी मार्गावर पारधी समाजाची वसाहत आहे़ रविवारी रात्रीपासूनच समाजातील दोन गटांत हाणामारी, भांडणाचा प्रकार सुरू झाला़ सोमवारी सकाळी रामदास चौहाण (वय ३२) याच्यावर चाकूहल्ला झाला़ पोटात चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला़ प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलविण्यात आले, पण तो मरण पावला़घटनेच्या प्रकारानंतर बिलोली पोलिसांनी संशयित म्हणून शिवा चौव्हाण, सुनील चौहाण, सोन्या चव्हाण यांना ताब्यात घेतले़ सदरील घटना पारधी समाजातील आपआपसात पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पो़नि़ सुरेश दळवे यांनी व्यक्त केला़ मयत रामदास हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालत होता़ रविवारी रात्रीच पारधींच्या टोळीत आपआपसात मोठी हाणामारी झाली़ ज्यात ८ ते १० जण जखमी झाले़ त्यात महिलाही होत्या़ पारधी समाजात प्रामुख्याने नाव-आडनाव सारखीच असल्याने तपासात अडथळे येत आहेत़ (वार्ताहर)लक्ष्मीबाई कचकलवाड यांचे निधनउमरी: तालुक्यातील गोळेगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीबाई महादू कचकलवाड (वय १०५) यांचे १३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा गंगाधर कचकलवाड, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सरपंच जनाबाई कचकलवाड यांच्या त्या आजीसासू होत. १४ रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कर करण्यात आले. (वार्ताहर)
बिलोलीत भरदिवसा तरूणाचा खून
By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST