लातूर : लातूर शहर व परिसरात दुचाकी चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहर व परिसरातून एक-दोन तरी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. आठवडाभरात दहा दुचाकींची चोरी झाली. परंतु, लातूरच्या पोलीस प्रशासनाला अद्यापपर्यंत एकाही दुचाकीचोरास पकडण्यात यश आले नाही. लातूर शहरात दिवसाकाठी एक-दोन दुचाकींची तरी चोरी होतच आहे. रविवारी शहरातील विशाल नगर भागातील हणमंत माधवराव शिंदे यांच्या एमएच २४ डब्ल्यू ११२३ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील पद्मा नगर भागातील सुरेश भास्कर यांनी स्वत:च्या घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच 0४ बीई ७२0८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. तसेच शहरातील जुनी रेल्वे लाईन भागातील परिसरात अमोल निनगुरकर यांची एमएच २४-२७१३ ही दुचाकी मंगळवारी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे. शहरातील बाश्री रोडवरील चाणक्य सोसायटीमध्ये शनिवारी पार्किंग केलेल्या बंडू स्वामी यांची दुचाकी चोरीस गेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच शहरातील जुना औसा रोड भागातील सद्गुरु नगरमध्ये राहणार्या रामकृष्ण फड यांच्या एमएच २४-९७४३ या दुचाकीची चोरी झाली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. तर मंगेश झुंजे यांची एमएच २६ ई ८८१४ या दुचाकीची शिवाजी चौकातून चोरी झाली. या प्रकरणी झुंजे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद झाली आहे. अशा पद्धतीने दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नव्या पोलिस अधीक्षकांना दुचाकी चोरट्यांनी जणू आव्हानच दिले आहे. (प्रतिनिधी) ■ आठवडाभरात चोरीचा आकडा दहा दुचाकींपर्यंत गेला आहे. तरीही यातील एकाही दुचाकी चोरास पकडण्यास शहर व जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले नाही. यामुळे दुचाकी वाहनतळावर तसेच घरासमोर दुचाकी पार्किंग करावी की नाही, असा प्रश्न पडला आहे. नूतन पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी २४ तास नाकाबंदी लावली आहे. दोन दिवस उलटूनही या नाकाबंदीतून दुचाकीचोर पोलिसांच्या नजरेस आले नाहीत.
दुचाकीचोर सक्रिय; आठवड्यात १0 गाड्या चोरीस
By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST