भाटेपुरी (ता. जालना) येथील सुनिता सुभाष आटोळे या महिलेने १९ जुलै २०१४ रोजी मौजपुरी पोलीस ठाण्यात भरत नारायण पणखले विरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घोडे याने वेळेत तपास करून आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात आरोपीने अटकपूर्व जामीन मिळविला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सुनिता आटोळे यांनी पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना दिली. त्यानुसार चौकशी करून जमादार घोडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. मूळ तक्रार अर्जात सुनिता आटोळे यांनी म्हटले होते की, त्यांच्या गावातील व परिचित असलेले भरत पणखले यांच्या सोबत टाटा फायनान्स कंपनीत जाऊन इंडिका व्हीस्टा कार खरेदी केली. कंपनीला गाडी घेण्यासाठी इतर कागदपत्रांसह सातबाराची गरज होती. सुनिता आटोळे यांच्याकडे सातबारा नसल्याने त्यांनी भरत पणखले यांचा सातबारा जोडून कंपनीस दिला. त्यामुळे सदरची गाडी भरत पणखले यांच्या नावावर घेतली.ही गाडी भविष्यात सुनिता आटोळे यांच्या नावावर करून देण्याचा करारही केला होता. सुरूवातील भाड्याचे पैसे नियमित देत होता. मात्र सहा-सात महिन्यांपासून पणखले पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. १४ जुलै रोजी सुनिता आटोळे यांनी गाडी विषयी विचारणा केली असता पणखलेने फायनंस कंपनीने गाडी नेल्याचे सांगितले. त्यानंतर मौजपुरी ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. यात कारवाई करण्यास जमादार घोडे याने विलंब केला. (प्रतिनिधी)
आरोपीला जामिनासाठी मदत; पोलीस निलंबित
By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST