लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा मिटमिटा परिसरातील अप्पावाडी येथे टाकण्यात येऊ नये म्हणून पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत बुधवारी दुपारी नागरिक रस्त्यावर उतरले होते. सायंकाळी मच्ंिछद्रनाथ मंदिराजवळ पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख विजय वाघचौरे हेसुद्धा सापडले. यानंतर संतप्त जमावाने पडेगाव येथे कचरा नेणारे मनपाचे वाहन पेटवून दिले. रात्री उशिरापर्यंत या भागात क्षणाक्षणाला विरोधाची ठिणगी भडकत होती.मिटमिट्यात दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत पोलीस विरुद्ध आंदोलक, असा सामना रंगला होता. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. यानंतर पोलिसांची अधिक कुमक मागवून येथील विरोधाची धग कमी केली. त्यानंतर घटनास्थळी माजी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन यांनी भेट दिली. मिटमिट्यातून परत येत असताना मच्ंिछद्रनाथ मंदिरासमोर संतप्त जमावाने त्यांना अडविले. यावेळी उभय नेत्यांना घेराव घालण्यात आला. याच वेळी कचºयाच्या गाड्या मिटमिट्याकडे जात होत्या. जमावाने या गाड्या अडवून परत पाठविल्या. जैस्वाल यांनीही जमावाची बाजू घेऊन गाड्या परत घेण्यास सांगितले.जमावातील एकाने पोलीस मारहाण करीत असल्याचे नमूद करीत तुमच्या आई-बहिणींना मारहाण झाली तर...असा शब्दप्रयोग केला. यावर जैस्वाल अधिक भडकले. आता कोणत्याही परिस्थितीत येथून गाड्या जाणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी उपस्थित पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू केला. जमावात सेनेचे शहरप्रमुख विजय वाघचौरेही सापडले. त्यांनाही पोलिसांचा प्रसाद घ्यावा लागला. सेना कार्यकर्त्यांनी वाघचौरे यांना अलगद बाजूला नेले. येथे संतप्त महिला रस्त्यावर येऊन आपला विरोध नोंदवत होत्या. विरोधाची ही ठिणगी शांत होत असतानाच पडेगाव येथे सायंकाळी पावणेसात वाजता संतप्त तरुणांनी कचºयाचे वाहन अडवून आग लावून दिली.उपनिरीक्षक गोरख चव्हाण व इतर सहकाºयांनी एक खाजगी टँकर अडवून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेनंतर पडेगाव भागात तणाव निर्माण झाला. आसपासची सर्व दुकाने क्षणार्धात बंद झाली होती.क्षणचित्रेऔरंगाबाद- नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे कचºयावरून तुफान दगडफेक सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक बंद केली.याच वेळी नगरनाक्याहून पुढे एक गॅसचा टँकर जात होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गॅस टँकरला लांब नेऊन उभे केले.सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात कचºयाची वाहने शरणापूर फाट्यापर्यंत नेण्यात आली.अप्पावाडीपर्यंत आंदोलकांनी ठिकठिकाणी चारचाकी वाहने जाऊ नये म्हणून खोल चाºया खोदून ठेवल्या होत्या.मनपा आणि पोलीस कर्मचाºयांंनी या चाºया बुजवून वाहने नेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करीत होते.कचºयाने भरलेली वाहने नगरनाक्यावर उभी होती. रात्री ही वाहनेही बाजूला सुरक्षितस्थळी हलविण्यात आली.महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने पदाधिकारी उशिरा पोहोचले.नागरिकांना विश्वासात घ्या - महापौैरमिटमिटा येथे बुधवारी दुपारी कचरा टाकण्यासाठी निघालेल्या वाहनांना आग लावण्यात आली. संतप्त जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही घटना अत्यंत चुकीची असून, मनपा प्रशासनाने पोलीस बळाचा वापर अजिबात करू नये. कोणत्याही भागात कचरा टाकायचा असेल तर त्या भागातील नागरिकांना अगोदर विश्वासात घेणे गरजेचे आहे. यानंतर बळाचा वापर न करता चर्चेचा मार्ग अवलंबिण्यात यावा, अशी सूचना महापौैर नंदकुमार घोडेले यांनी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांना केली.
औरंगाबादचा कचरा प्रश्न : क्षणाक्षणाला पेटता संघर्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:48 IST
शहरातील कचरा मिटमिटा परिसरातील अप्पावाडी येथे टाकण्यात येऊ नये म्हणून पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत बुधवारी दुपारी नागरिक रस्त्यावर उतरले होते. सायंकाळी मच्ंिछद्रनाथ मंदिराजवळ पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख विजय वाघचौरे हेसुद्धा सापडले. यानंतर संतप्त जमावाने पडेगाव येथे कचरा नेणारे मनपाचे वाहन पेटवून दिले. रात्री उशिरापर्यंत या भागात क्षणाक्षणाला विरोधाची ठिणगी भडकत होती.
औरंगाबादचा कचरा प्रश्न : क्षणाक्षणाला पेटता संघर्ष...
ठळक मुद्देसायंकाळीही लाठीचार्ज : कच-याच्या वाहनाला लावली आग