औरंगाबाद : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून लुटमार करण्याच्या उद्देशाने जमलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला वाळूज पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.अर्चना ताग्या काळे, सरिता गणेश काळे, ताग्या काळे, रावसाहेब काळे, तुणतुण्या काळे (सर्व रा. वाळूज) यांना अटक करण्यात आली आहे. वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी सोन्याचे दागिने स्वस्तात विकायचे आहेत, असे सांगून श्रीमंत ग्राहकाच्या शोधात असतात. त्याचा विश्वास संपादण्यासाठी ते त्याला खरे सोन्याचे दागिने दाखवितात. त्याची खात्री पटल्यानंतर ते त्या ग्राहकाला एक किलो दागिने अर्ध्या किमतीत विकायचे असल्याचे सांगतात. सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद बाबर महंमद अली हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना या संशयित टोळीला त्यांनी अटक केली.त्यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक परजणे करीत आहेत. हल्ल्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्तग्राहकाला लाखो रुपये घेऊन निर्जनस्थळी बोलवतात. रक्कम घेऊन आलेल्या ग्राहकावर शस्त्राने हल्ला करून ते त्याच्याकडील रक्कम हिसकावतात.अशा प्रकारचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते नकली सोन्याच्या अंगठ्या आणि लुटमार करण्यासाठी लोखंडी सळई, वायरची दोरी, तिखटपूड आणि मोबाईल हॅण्डसेट घेऊन आले होते. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता वरील साहित्य त्यांच्याजवळ आढळले.
दरोडेखोरांच्या टोळीला अटक
By admin | Updated: June 27, 2014 01:04 IST