उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील बेंबळी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून किराणा साहित्य, फरशीसह संगणक असा एक लाख ५५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या घटना शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, बेंबळी येथील जहिरोद्दीन शेख यांच्या भर चौकातील किराणा दुकानाच्या शटरचे शटर रविवारी पहाटे उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील काजू, निरमा पुड्यासह इतर किराणा साहित्य असा ६४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ या प्रकरणी जहिरोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि प्रशांत पाटील हे करीत आहेत़उस्मानाबाद शहरातील जिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे व निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे़ या बांधकामावरील १३ हजार रूपयांचे स्टाईल फरशाचे २० बॉक्स शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी लंपास केले़ याप्रकरणी बांधकामावरील व्यवस्थापक रोहित लगाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोउपनि हलसे हे करीत आहेत़ तर शहरातील जिजाऊ चौकाजवळ असलेल्या स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कूलच्या संगणक कक्षात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून ७८ हजार रूपयांचे तीन संगणक लंपास केले़ या प्रकरणी मुख्याध्यापीका संगिता गहिरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर शहरातील अलहाबाद बँकेच्या शेजारी बँकेने एटीएम मशीन बसविली आहे़ रविवारी दुपारच्या सुमारास या एटीएम मशीनमध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोउपनि हालसे हे करीत आहेत़नागरिकांमध्ये दहशतउस्मानाबाद शहरात तीन ठिकाणी तर बेंबळी येथे भर चौकातील किरणा दुकान फोडून चोरी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात यापूर्वीही अनेक चोरीच्या घटना घडल्या असून, यातील बहुतांश घटनांचा अद्याप तपास लागेला नसताना पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी) बेंबळी येथील किरणा दुकान चोरी प्रकरणात उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते़ या श्वानाने दुकानापासून बोरखेडा रोडवरील स्वामील पर्यंत माग काढला़ तेथून शेतातून बोरगाव रोडवर काही अंतरापर्यंतच माग काढला़ नंतर श्वान तेथेच घुटमळल्याने तेथे एखादे वाहन लावून आणण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे़अचलेर ग्रामस्थांतही घबराटअचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. मागील काही दिवसापासून अनेकांच्या घरातून साहित्य चोरीस गेले असून, शनिवारी रात्रीच्या सुमारास अचलेर येथील सीताराम माळगे यांच्या टेलरिंगच्या दुकानातून शिवलेले कपडे चोरीला गेले तसेच सटवाजी शिंदे यांच्या घरातील दोन शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या. यापूर्वीही शाळेतील प्रयोगशाळा फोडून प्रयोगाच्या साहित्याची चोरी झाली. या चोऱ्यांच्या प्रकारामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सशस्त्र चोरट्यांचा परंड्यात धुमाकूळ
By admin | Updated: February 16, 2015 00:51 IST