अर्धापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना किमान बारावीपर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली आहे़तालुक्यातील तामसा मार्गावरील लहान, चाभरा, लोण येथून १५० मुली, हिंगोली मार्गावर निमगाव, पार्डी येथून ७० मुली, वसमत मार्गावरील कामठा, मेंढला, खडकी येथून १२५ मुली, नांदेड मार्गावरील जांभरून, दाभड येथील ५० मुली व इतर ठिाणच्या अशा एकूण ६०० मुली अर्धापूरला शिकवणीसाठी येतात़दीड लाखांच्या जवळपास रुपये विद्यार्थी पासेसमार्फत एस़टी़ महामंडळाला उत्पन्न असताना त्या मानाने येथील बसस्थानकावर सुविधा नाहीत़ अद्ययावत वेळापत्रक नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महत्त्वाचे म्हणजे प्रसाधन गृहाची सोय नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ विशेषत: विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे़भरपूर संख्येने असलेल्या विद्यार्थिनींची एसटी बसमधून प्रवास करताना व बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते़ सावित्रीच्या लेकींना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाता यावे, यासाठी शासनाने खास मुलींसाठी ८६९ बसेस घेवून दिल्या आहेत़ भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड व भोकर तालुके मानव विकास योजनेत अंतर्भुत आहेत़ पण विद्यार्थिनींची संख्या जादा असताना अर्धापूर तालुका या योजनेपासून वंचित आहे़ गेल्या दोन वर्षांपासून याबाबत विचार झाला नाही़ अर्धापूर तालुक्याचा मानव विकास मिशन मोफत वाहतूक व्यवस्थेत समावेश करावा, अथवा शाळा, कॉलेजच्या वेळेनुसार नियमित एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)तालुक्यात विविध पदावर महिला अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संख्या भरपूर असताना तालुक्याच्या बसस्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय नसावी ही लाजीरवाणी बाब आहे - शिवाजी कपाळे, पालक, रा़चाभरा़विद्यार्थिनींसाठी शाळा, कॉलेजच्या वेळेनुसार ये-जा करण्यासाठी नियमित एस़टी़ बसेसची सोय करण्यात यावी - सुहासिनी सुभाष सावंत, बीसीए, द्वितीय वर्षबस स्थानकावर विद्यार्थिनी व महिलांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे - राजनंदीनी माणिकराव पिंपळे, विद्यार्थिनी बीसीए, तृतीय वर्ष़
अर्धापूरकरांत नाराजी
By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST