शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास ७० हेक्टरवर आमराई असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याची जुनी झाडे आहेत़ त्यामुळे दरवर्षी आंब्याचा सुकाळ असतो़ परंतु, यावर्षी सलग आठवडाभर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आमराईस मोठा फटका बसला आहे़ परिणामी नागरिकांना मंगळवारी आमरसाविना अक्षयतृतीय साजरी करावी लागली़तालुक्यातील साकोळ घरणी, पांढरवाडी, डोंगरगाव असे मोठे प्रकल्प असल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत़ एकंदर ७० हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे़ परंतु, या आंब्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी प्रत्येकाच्या घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा नैवैद्य केला जातो़ यावर्षी आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात विक्रीसाठी आंबाच दिसून येत नाही़
आमरसाविना अक्षयतृतीया
By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST