आशपाक पठाण , लातूरशिवसेना- भारतीय जनता पक्षात जागा वाटपावरून नुसतेच चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे़ गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेत तोडगा निघत नसल्याने इच्छुक उमेदवारांचे लक्ष हायकमांडच्या भूमिकेकडे लागले आहे़ लातूर जिल्ह्यात सहापैकी ४ मतदारसंघ काँग्रेस, १ राष्ट्रवादी काँग्रेस व १ भाजपाच्या ताब्यात आहेत़ तसे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचेच वर्चस्व आहे़ लोकसभा निवडणुकीत भाजपाला ६ पैकी ५ मतदारसंघात लीड मिळाली होती़ त्यामुळे आता भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे़ मात्र युती होत नसल्याने इच्छुक कोणता झेंडा घेऊ हाती़़़या संभ्रमात सापडले आहेत़ शिवाय, लातूर शहरातील भाजप कार्यकर्ते युती तुटण्याचीच वाट पाहत आहेत. तशी त्यांना ही जागा सोडवून घ्यायची आहे. तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच भाजपकडे असल्याने सेनेला मात्र उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, सेनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष हरिभाऊ साबदे यांना परवाच ‘मातोश्री’वरून बोलावणे आले होते. युती तुटल्यास ते सेनेचे उमेदवार असतील.लातूर शहर मतदारसंघात भाजपाकडून शैलेश लाहोटी यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात आहे. मात्र हा मतदारसंघ सेनेकडे असल्याने तो भाजपाला सोडवून घेण्यासाठी राज्यस्तरावर भाजपाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.लातूर शहर मतदारसंघातून भाजपाचे शैलेश लाहोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास विजयाचा आत्मविश्वास पक्षाला आहे. त्यामुळे युती तुटल्यास लातूर भाजपाला आनंदच आहे.
युतीचा बेबनाव; कार्यकर्ते संभ्रमात
By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST