शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेती शाश्वत असावी

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

जालना : नेहमीच्या अवर्षणाचा विचार करता शेती शाश्वत करण्याची गरज असून त्यादृष्टीने पीक व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर खर्च व पाण्याची काटकसर करुन शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे,

जालना : नेहमीच्या अवर्षणाचा विचार करता शेती शाश्वत करण्याची गरज असून त्यादृष्टीने पीक व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर खर्च व पाण्याची काटकसर करुन शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे यांनी केले.खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हैद्राबाद येथील क्षेत्रीय प्रकल्प संचालनालयाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंदर रेड्डी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमाकांत घाटगे, राष्ट्रीय कृ:ी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशाषधन डॉ. ,स. बी. पवार, कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, डॉ. बी. आर. शिंदे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश कोहिरे, अग्रणी बॅँकेचे प्रदीप कुतवळ, नाबॉचे पी. जी. भागवतकर, माविमचेएम. डी. काळे, डॉ. जे. बी. देसाई, ए. डी. गुट्टे, प्रा. एस. व्ही. सोनुने, प्रगतशील शेतकरी उध्दवराव खेडेकर, बाबासाहेब काटकर, छायाताई मोरे आदींची उपस्थिती होती.कृषि विज्ञान केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळण्यात या शास्त्रीय सल्लागार समितीचा मोठा फायदा झाल्याचे सांगून बोराडे म्हणाले की, बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, नेहमीचा अवर्षण काळ यांचा विचार करता शेती शाश्वत करण्याकरीता भविष्यामध्ये आपत्कालीन पीक व्यवस्थापन करतांना कमी पाणी, कमी खर्च करुन येणाऱ्या पिकांचा विचार व्हावा. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने रेशीम उद्योग, शेळी पालन, कुक्कूट पालन व फुलशेती इत्यादी व्यवसायाचा अवलंब करुन त्यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके उभारावीत व जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत प्रसारीत करण्याची गरज असल्याचे विजयअण्णा बोराडे यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचलन प्रा. अजय मिटकरी तर आभार प्रदर्शन प्रा. पंडीत वासरे यांनी केले.४कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यात विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिके राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. यशस्वी प्रात्यक्षिकांचे प्रबंधीकरण करुन इतर भागाच्या विकासासाठी प्रसार करण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र रेड्डी यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख सोनुने यांनी मागील वर्षात केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल व पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर करुन सांगितलेल्या सूचनासंदर्भात माहिती दिली.