प्रवीण माधव सावकारे (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. सावकारे हे सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथे कार्यरत होते. तक्रारदार शेतकरी यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत शेतात फळबाग लागवड केली होती. या योजनेनुसार फळबागेचे परीक्षण करून वरिष्ठांना अहवाल देण्यासाठी सावकारे याने तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाच मागितली. त्यावेळी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपी तडजोड करीत २० हजार रुपये घेण्यास तयार झाला व गुरुवारी पैसे घेऊन बोलावले. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात २० हजार रुपये लाच घेताना आरोपी सावकारे रंगेहाथ अडकला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास घनवट, पो. हे. कॉ. गणेश पांडुरे, प्रकाश घुगरे, जोशी, मिलिंद इप्पर चालक पो. कॉ. बागुल यांनी केली.
लाच घेताना कृषी सहाय्यक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST