अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे मोठ्या भावाच्या मृत्यूपाठोपाठ लहान भावानेही प्राण सोडल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली.संतुकराव नारायण बनकर (वय ८०) आणि किसन नारायण बनकर (वय ७०) या भावंडांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होते. संतुकराव यांचे ९ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मोठ्या भावाच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने किसन यांनीही १० डिसेंबर रोजी प्राण सोडला. त्यांचाही हृदयविकाराच्या घक्क्याने मृत्यू झाला. दोन्हींच्या पार्थिवावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही भावंडाच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. दोन्ही भावंडांच्या पश्चात सहा मुले, एक मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. (वार्ताहर)४या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थांना शोक अनावर झाला. गावात शोककळा व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभर गावात चूलही पेटली नव्हती. दोन्ही भावंडांच्या जीवापाड प्रेमाविषयी गावात चर्चा सुरू होती.
ज्येष्ठाच्या मृत्यूपाठोपाठ लहान भावानेही प्राण सोडला
By admin | Updated: December 12, 2014 00:52 IST