औरंगाबाद : विभागात पाणीपुरवठ्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १,२३७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक ४२८ विहिरी एकट्या बीड जिल्ह्यात अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात ३१०, जालना जिल्ह्यात ५४, हिंगोली जिल्ह्यात १२, नांदेड जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात १३९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २४६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या १०७ ने वाढली आहे. मोठ्या प्रकल्पातील साठ्यांची स्थितीजायकवाडी- ४ टक्केयेलदरी- ४० टक्केसिद्धेश्वर- ० टक्कामाजलगाव- ० टक्कामांजरा- ० टक्काऊर्ध्व पेनगंगा- ४४ टक्केनिम्न तेरणा- ० टक्कामनार- १९ टक्केविष्णुपुरी- १० टक्केनिम्न दुधना- ३२ टक्केसिना कोळेगाव- ० टक्काएकूण सरासरी- १८ टक्के
१,२३७ विहिरींचे अधिग्रहण
By admin | Updated: July 2, 2014 01:03 IST