शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

चाऱ्याअभावी महिन्यात

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

एम.जी. मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत

एम.जी. मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने दखल घेऊन नुकसान झालेल्या पशुधनाची भरपाई द्यावी. तात्काळ चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी पशुपालक तुळशीराम जाधव, विश्वास आडे, बाबूराव सोनकांबळे यांच्यासह बंजारा समाजबांधवांनी केली आहे. या घटनेमुळे जळकोट तालुक्यातील आसपासच्या २० ते २५ वाडी-तांड्यांवर पशुधनाचे असेच हाल होत असल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर तांडा येथे एक हजार जनावरे असून, येथील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कडबा, गवत या चाऱ्याऐवजी झाडपाला तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबरोबरच इतर ठिकाणचेही पशुधन चाऱ्याअभावी अशक्त व भाकड झाली आहेत. त्यामुळे ही जनावरेही दगावण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे तुळशीराम जाधव व विश्वनाथ आडे यांनी सांगितले. बंजारा समाजाचा मूळ व पारंपारिक व्यवसाय पशुधन जगविण्याचा आहे. शेतकऱ्यांकडील जनावरे आर्धालीच्या बोलीने राखली जातात. प्रत्येक कुटुंबाकडे ६० ते ७० जनावरे असतात. यावर्षी तालुक्यात ३५० मि.मी. पाऊस झाल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. दुर्मिळ असणाऱ्या कडब्याच्या पेंढीचा भावही २० रुपयांवर गेला आहे. शेतकऱ्यांना व बंजारा समाजाच्या बांधवांना महागामोलाचा कडबा विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जनावरे भाकड होऊन दगावत आहेत. तर शेकडो जनावरे मातीमोल दराने विक्री केल्याने त्या पशुधनावर कत्तलखान्याकडे पाठविण्याची वेळ आली आहे. जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, माळहिप्परगा, चितलंगी तांडा, फकरु तांडा, पोमा तांडा, चतुरा तांडा, अतनूर तांडा, अग्रवाल तांडा, भवानीनगर तांडा, मरसांगवी तांडा, जळकोट तांडा, गुत्ती तांडा, फटकडी तांडा, बालाजीवाडी तांडा आदी ठिकाणच्या पशुधनाचे चाऱ्याअभावी बेहाल होत आहेत. माळरानात चाऱ्याचा शोध घेत आहेत. तर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ या पशुधनावर आली आहे. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने पशुपालकांना आपले पशुधन सांभाळावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.