शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

900 शौचालयाचे बांधकाम पूर्ण

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

पालम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात निर्मल भारत अभियान रोजगार हमी योजनेंतर्गत ९०० शौचालयाचे बांधकाम विविध गावांमध्ये पूर्ण झाले आहे.

पालम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात निर्मल भारत अभियान रोजगार हमी योजनेंतर्गत ९०० शौचालयाचे बांधकाम विविध गावांमध्ये पूर्ण झाले आहे. या कामासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. पालम तालुक्यात ग्रामीण भागातील गावे हागणदारीमुक्त व निर्मल करण्यासाठी पंचायत समितीने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतलेली आहे. शौचालयाच्या बांधकामासाठी पंचायत समितीकडून प्रत्येक लाभार्थ्याला नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यामध्ये निर्मल भारत अभियान ४ हजार ५०० तर रोजगार हमी योजनेतून उर्वरित ४ हजार ५०० रुपयांची रक्कम लाभार्थ्यांना अदा केली जाते. प्रत्येक गावात शौचालयाची कामे गतीने व्हावेत, यासाठी ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. शौचालयाच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे ४६० ई-मस्टर काढण्यात आले असून मजुरांना मजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत शहरासह तालुक्यात ९०० शौचालयाचे काम पूर्ण झालेले आहेत. या कामासाठी गटविकास अधिकारी मधुकर कदम, वचिष्ट पवार, संदीप डोईफोडे, संजय पंडित, अभियंता उन्हाळे, बांगर, अनिल शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये शौचालयाची कामे केली जात आहेत. शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळत असल्याने ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याने शौचालयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालम तालुक्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त होण्याकडे वाटचाल करीत आहेत. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व निर्मल होण्याची गरज आहे. शौचालयाच्या कामासाठी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे गाव स्वच्छ होईल व शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होण्यास मदत होईल. शौचालय बांधकामास गती देण्यासाठी ग्रामस्थांंनी पुढे यावे व शौचालय बांधून घ्यावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी कदम यांनी केले आहे.