उस्मानाबाद : चालू वर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील २११ प्रकल्पांमध्ये केवळ ३़९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे़ विशेष म्हणजे ८७ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, ८५ प्रकल्पात मृतसाठा म्हणजेच गाळयुक्त पाणी शिल्लक आहे़ तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा उपलब्ध आहे़ गत वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील २११ प्रकल्पांमध्ये तब्बल ७़५७१ टक्के पाणीसाठा होता़ यावर्षी यात तब्बल चार टक्क्यांनी घट झाल्याचे दिसत आहे़ परिणामी दिवसेंदिवस घटणारी पाणीपातळी, उन्हाची वाढती तीव्रता यामुळे मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक भीषण होणार असल्याचे चित्र आहे़मागील वर्षी अपुरा पाऊस पडल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये केवळ ५० टक्क्यांच्या आसपासच पाणीसाठा झाला होता़ तर उमरगा, भूम, लोहाऱ्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील काही प्रकल्प चक्क कोरडेठाक होते़ परिणामी सद्यस्थितीत गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्यापेक्षाही कमी प्रमाणात पाणी प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे़ प्रकल्पीय अहवालानुसार जिल्ह्यातील १५ पैकी परंडा तालुक्यातील खंडेश्वरी, साकत व कळंब तालुक्यातील रायगव्हाण हे तीन मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत़ तर उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रूईभर, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा, उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, बेन्नीतुरा सात प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे़तर तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात ४़६०० दलघमी पाणी असून, उपयुक्त पाणी ५़२ टक्के आहे़ हरणी ्रकल्पात १़५५० दलघमी पाणीसाठा असून, १़३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ भूम तालुक्यातील बाणगंगा प्रकल्पात १़७५६ दलघमी पाणी असून, उपयुक्त पाणी १५़८१ टक्के आहे़ तर सर्वाधिक १़७२५ दलघमी पाणीसाठा रामगंगा प्रकल्पात असून, या प्रकल्पात १७़३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ मागील वर्षीची या मध्यम प्रकल्पांमध्ये तब्बल १०़७५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ तर चालू वर्षी या प्रकल्पांमध्ये केवळ २़१३ टक्के उपयुक्त पाणीसठा आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ७३़६४९ दलघमी पाणीसाठा असून, यातील केवळ २५़६ दलघमी पाणीसाठा उपयुक्त आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी ३़९४ टक्के आहे़ मागील वर्षी याच कालावधीत तब्बल ५७़९९२ दलघमी म्हणजे ७़६७१ टक्के जिल्ह्यात उपयुक्त पाणीसाठा होता़ त्यामुळे मागील वर्षी टंचाईची तीव्रता कमी होती़ मात्र, गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटचा टप्पा व जानेवारी महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे़प्रस्तावांमध्ये वाढ जिल्ह्यातील साठवण प्रकल्प कोरडेठाक पडत असल्याने गावा-गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत़ परिणामी पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे टँकर, कुपनलिका अधिग्रहणाचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहे़(प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाणीसाठा असलेल्या प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे़ मात्र, अनेक ठिकाणी शेतातील पिकांसाठी, फळबागांसाठी छुप्यारितीने आजही अवैधरित्या पाणीउपसा सुरू आहे़ परिणामी मागील आठ दिवसात जिल्ह्यातील प्रकल्पातील २़९१ दलघमी पाण्याचा उपसा झाला आहे़ गत आठवड्यात या प्रकल्पांमध्ये २७़९७ दलघमी पाणी होते़ तर सद्यस्थितीत २५़०६ दलघमी पाणीसाठा आहे़वाढते उन आणि अवकाळी पावसाचा सामना करीत टंचाईवर मात करणाऱ्या जिल्हावासियांना मान्सूच्या आगमनाचे वेध लागले आहे़ हवामान खात्याने प्रारंभी वेळेत व चांगल्या पध्दतीने पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते़ त्यानंतर पावसाची टक्केवारी कमी दाखवून पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते़ तर आता अमेरिकेच्या हवामान खात्याचा अहवाल देत यंदाही भारतावर दुष्काळाचे सावट असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या जिल्हावासियांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे़
८७ प्रकल्पांमध्ये ठणठणाट !
By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST