संजय कुलकर्णी , जालनाजवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मार्चएन्डची धामधूम सुरूच असून ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ७६ कोटींची ७०५ देयके मार्गी लागली. ३१ मार्च रोजी साधारणत: ५०० देयके मार्गी लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जिल्हा नियोजन मंडळाचा निधी शंभर टक्के वेळेत खर्च करावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना गेल्या महिन्यात दिलेली आहे. कोणत्याही विभागाचा निधी परत जाऊ नये, यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारावी, असेही सुचविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार अधिकारी कल्याणराव औताडे यांनी मार्च २०१५ च्या प्रारंभीच सर्व शासकीय विभागांना ई-मेलद्वारे जी प्रदाने देयके आहेत, ती तात्काळ कोषागार कार्यालयात सादर करावीत, अशी सूचना केली होती. २९ मार्च रोजी जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून १४३ देयके या कार्यालयाने स्वीकारली. या देयकांची अंदाजित रक्कम २० कोटींपर्यंत आहे. तर ३० मार्च रोजी ३८३ देयके दाखल झाली. त्यांची रक्कम ५१ कोटी १६ लाख ३२ हजार ८९८ रुपये एवढी आहे. (प्रतिनिधी)जिल्हा व तालुका कोषागार कार्यालयाअंतर्गत एकूण ५८ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी १२ पदे रिक्त आहेत. आॅनलाईन व्यवहारामुळे सद्यस्थितीत या कर्मचाऱ्यांवर कामाचा फारसा ताण येत नसला तरी ३१ मार्च रोजी एकाच दिवसात अनेक देयके मार्गी लावावयाची असल्याने कामाचा भार अधिक वाटल्यास देयकांची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी औताडे यांनी सांगितले. शासकीय व्यवहार करणाऱ्या जालना शहराच्या मर्यादेतील बँकांमध्ये ३१ मार्च रोजी तालुकास्तरावर रात्री ९ तर जिल्हास्तरावर रात्री ११ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील. कोषागार कार्यालयांमध्ये तालुकास्तरावर सायंकाळी ६ तर जिल्हास्तरावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत देयके प्राप्त करून घेतली जातील.जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाअंतर्गत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मार्च २०१५ चे वेतन १ एप्रिल रोजी अदा करणे आवश्यक होते. परंतु शासकीय कार्यालये व बँका यांना सलग पाच दिवस सुट्या आल्याने सेवानिवृत्तांचे वेतन ६ एप्रिल रोजी अदा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
७६ कोटींची देयके लागली मार्गी
By admin | Updated: March 31, 2015 00:36 IST