उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)
७१८ जण निवडणूक रिंगणात
By admin | Updated: February 8, 2017 00:20 IST