शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ६४ हजार मतदार वाढले

By admin | Updated: September 13, 2014 23:53 IST

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रपरिषद घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना २० सप्टेंबर रोजी निघणार असून त्याच दिवसांपासून उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. २७ सप्टेंबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जिल्ह्यात जवळपास २५ लाख मतदार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार १७ सप्टेंबरपर्यंत मतदार नावनोंदणी करु शकतील. लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या लक्षात घेतली असता आतापर्यंत ६४ हजार मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदारयादीतील एकही नाव वगळण्यात आले नाही.विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उत्तर प्रदेशातून आलेल्या मतदानयंत्र वापरले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. नवरात्र महोत्सव मंडळांना सूचना निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत नवरात्र महोत्सव आणि बकरी ईद हे महत्वाचे सण येत आहेत. या महोत्सव कालावधीत मंडळाकडून राजकीय प्रचार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी़चोख पोलिस बंदोबस्तसुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी माहिती दिली. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून बाहेर जिल्ह्यातून फौजफाटा मिळण्याची शक्यता कमी असल्याने बंदोबस्तासाठी होमगार्ड, स्पेशल पोलिस आॅफिसर, सेवानिवृत्त अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, वनविभागातील अधिकारी यांची मदत घेण्यात येईल. त्यासह राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या प्रत्येकी तीन तुकड्या बंदोबस्तासाठी मिळणार आहेत. आंतर जिल्हा, आंतरराज्य सीमेवर फिक्स पाँईट निश्चित करण्यात आले असून यासाठी पोलिस, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह व्हिडीओग्राफर उपस्थित राहणार आहेत. नऊ विधानसभा मतदारसंघात प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे ४१ गुन्हे दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ती परवानगी घ्यावी. यासाठी प्रशासनाकडून एक खिडकी योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही चिखले म्हणाले.मतदारांकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असले तरी मतदानयादीत नाव नसल्यास मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. मतदारांसाठी ०२४६२-२४८२४८ या क्रमांकावर हेल्पलाईन सुविधा उपलब्ध राहील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रशासन मतदारांना व्होटरस्लिप देणार आहे. मतदानापूर्वी आठ दिवस अगोदर या स्लिप मतदारांपर्यत पोहोचतील. तक्रारीसंदर्भात ०२४६२-२४७२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.