जालना : जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झाली. पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ७५० पैकी ६०५ उमेदवार हजर होते.६०५ उमेदवारांपैकी ५७ उमेदवार उंचीमध्ये, १२४ उमेदवार छातीमध्ये व २९ उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये मिळून २१० उमेदवार अपात्र झाले आहेत. तर ३९५ उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या भरती प्रक्रियेसाठी पोलीस शिपाई पदासाठी मंगळवारपासून राज्य राखीव दलाच्या मैदानावर चाचणीला सुरूवात होणार आहे. २७ शिपाई पदांसाठी तब्बल ५ हजार ३३८ अर्ज आले आहेत. त्यात ३ पदे महिलांसाठी राखीव आहेत. जिल्ह्यात १८ पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्यात १६ पोलिस निरीक्षकांची आणि ३० ते ३५ पोलिस उपनिरीक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु अनेक पोलिस ठाण्यात पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि क्राईमरेट त्यासाठी पोलिस पदासाठी मागणी करण्यात येते. सध्या जालना पोलीस दलाकडे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक आणि पोलिस शिपायांची विविध पदे रिक्त आहेत. मंगळवारी झालेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी ६०५ उमेदवारांची हजेरी
By admin | Updated: March 30, 2016 00:37 IST