शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

५० लाखांचा निधी चार वर्षांपासून पडून

By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या ३५ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठीचा ५० लाखांचा निधी गेल्या चार वर्षांपासून पडून असून मुदत संपल्यानंतर देखील कामे पूर्ण न झाल्याने

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या ३५ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठीचा ५० लाखांचा निधी गेल्या चार वर्षांपासून पडून असून मुदत संपल्यानंतर देखील कामे पूर्ण न झाल्याने ही कामे रद्द करण्याच्या हालचाली शिक्षण विभागामार्फत सुरू झाल्या आहेत.जिल्ह्यात २०११ ते २०१३ या कालावधीतील ८५ कामे अपूर्ण आहेत. मात्र त्यापैकी काही कामांची मुदत आणखी शिल्लक असल्याने ती सुरू आहेत. मात्र ३५ कामांची मुदत संपून देखील ती पूर्ण झालेली नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत कामे प्रगतीपथावर असल्याचे दर्शविण्यात येते. मात्र त्याचे काम कोठपर्यंत झालेले आहे, याची माहिती नसते. त्यामुळे कामे सुरू झाली किंवा नाहीत, हा देखील प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झालेला आहे.शिक्षण विभागाच्या मंगळवारी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत हा मुद्दा समोर आल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनाही याबाबतचे उत्तर देता आले नाही. या कामांमध्ये जालना तालुक्यातील १, बदनापूर २, भोकरदन ४, मंठा ९, परतूर १०, घनसावंगी ५, अंबड ३ आणि जाफराबाद तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. ३० हजारांपासून १ लाख ८० हजार रुपयांपर्यंतचा निधी या शाळांमधील वर्गखोल्या दुरूस्तीसाठी देण्यात आलेला आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी अद्याप कामे पूर्ण केलेली नाहीत.या कामांमध्ये नायगावतांडा, पाटोदा, एरंडवडगाव, लक्ष्मणनगर, मात्रेवाडी, कडेगाव, पोखरी, मेहगाव, करजगाव, बाभूळगाव, लोणगाव, विटा नं. १, सावरखेडा टाकळी, देवठाणा उस्वद, कठोळा खु., कानफोडी, कानफोडी तांडा, श्रीराम तांडा, पेवा, अंभोडा कदम, माहोरा, गोळेगाव, वरफळ, हातडी, फुलवाडी, लोणी, पळसी, ब्राह्मणवाडी, अकोली, लिखितपिंप्री, सुरूमगाव, मुढेगाव, गाढेसावरगाव, घनसावंगी, घोन्सी, लासुरा, काटखेडा, खडकेश्वर, घोडेगाव इत्यादी शाळांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडून २०११-१२ व २०१२-१३ अंतर्गत या शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्तीसाठी निधी मिळाला होता. दोन वर्षात काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत अनास्था दाखविल्याने ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.