शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

४७ क्रशरला ठोकले सील

By admin | Updated: March 30, 2015 00:43 IST

बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यातीेल अवैध गौण खनिजात गौडबंगाल आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४७ क्रशरला सील ठोकण्यात आले आहे

बाळासाहेब जाधव ,लातूरजिल्ह्यातीेल अवैध गौण खनिजात गौडबंगाल आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४७ क्रशरला सील ठोकण्यात आले आहे. तसेच देवणी तालुक्यातील एक मंडळ अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या थकबाकीदार माफियाविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांनी हाती घेतली आहे़ लातूर जिल्ह्यातील ९१ परवानाधारक खडी केंद्रापैकी ४७ खडी केंद्रे थकबाकीअभावी सील करण्यात आलेली आहेत़ तर अवैध असलेले १६ खडीकेंद्रही सील करण्यात आली आहेत़ ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करताच संबंधित वाळूमाफिया व क्रशरमाफियाने थकबाकी भरणे सुरु केले़ यामध्ये दंडात्मक कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या देवणी तालुक्यातील मंडळ अधिकारी व निलंगा, लातूर तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील दहाही तहसीलदार सतर्क झाले. त्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांना दंडात्मक कारवाईचे आदेश दिले़ तसेच थकबाकी न भरणाऱ्या वाळू, मुरुम माफिया व खडी केंद्रांवरील कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कारवाईला गती आली आहे़ लातूर तालुक्यातील २६ खडी केंद्रापैकी १० खडीकेंद्र थकबाकीअभावी सीलबंद करण्यात आले़ औसा तालुक्यातील १५ पैकी ११, रेणापूर तालुक्यातील ४ पैकी २, निलंगा ५ पैकी ३, शिरुर अनंतपाळ १, देवणी ५ पैकी ४ उदगीर ५, जळकोट १, अहमदपूर १२ पैकी ४, चाकूर तालुक्यातील १० पैकी ६ अशा एकूण ४७ खडी केंद्रावर थकबाकी न भरल्याने सील करण्यात आले आहेत. तर उर्वरित खडी केंद्रवाल्याकडून ३८ लाख ९० हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. शिवाय, ५८ वाळूघाटापैकी ४ टप्प्यात झालेल्या ११ वाळू घाटाच्या लिलावातून ४६ लाख ९९ हजार ४४० रुपयाची वसुली करण्यात आली़ या वसुलीमुळे लातूर जिल्ह्याचे उद्दिष्टे ७६ टक्क्यांवर गेले आहे़ आजतागायत १५ कोटी २८ लाख रुपयांची वसुली झाली आहे़