जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी छाननी प्रक्रियेअंती एकूण १७७ उमेदवारांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १३६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १ आॅक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. परतूर मतदारसंघात ३२ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे येथे आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. घनसावंगी मतदारसंघात ३१ पैकी ६ जणांचे अर्ज बाद झाल्याने तेथे २५ उमेदवार आहेत. जालना मतदारसंघात एकूण ४२ पैकी १७ जणांचे अर्ज बाद झाले. २५ जणांचे अर्ज वैध ठरले. बदनापूर मतदारसंघात ३३ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. भोकरदन मतदारसंघात ३९ पैकी एकाच उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ३८ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. बदनापूर मतदारसंघातून मोहन तायडे, परमेश्वर गरबडे, दुर्गा सुनील चौधरी, मेहेर प्रकाश नारायणकर, भारत जाधव, भगुरे बालचंद, माया जाधव, डॉ. अभिजीत भालशंकर, मधुकर कदम, बबन कांबळे, ज्ञानोबा व्हावळे यांचे अर्ज बाद झाले.जालना मतदारसंघातून १७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामध्ये रणजित विश्वनाथ रत्नपारखे, गणेश शेषराव क्षीरसागर, शेख चाँद पाशा, वाहुळे परमेश्वर यादवराव, म्हस्के रवि पांडुरंग, आनंद कुंडलिक म्हस्के, आनंदा लिंबाजी ठोंबरे, मो. साजेद मो. हरूण, नागसेन संपतराव बनकर, पांडुरंग मताजी कोल्हे, महंम्मद उस्मान महंम्मद इब्राहिम, लांडगे रतन आसाराम, दीपक बबनराव बोरडे, सुनील भाऊराव साळवे, भाऊराव मल्हारी साळवे, अर्जुनराव दादापाटील भांदरगे, उगले वैभव सुरेश यांचा समावेश आहे. परतूर मतदारसंघातून माधवराव कदम, सूर्यकांत बरकुले, शिवाजी डवरे, प्रभाकर रणशूर, शेख अजहर, भीमराव वाघ यांचे अर्ज बाद झाले आहेत. घनसावंगी मतदारसंघातून मनीषा टोपे, शिवाजी चोथे, सूरज उढाण, रणपिसे राधाकृष्ण, गाडगे तुकाराम व मोहिते रामभाऊ तर भोकरदन मतदारसंघातून म्हस्के गिताबाई दिलीप यांचा अर्ज बाद झाला. प्रत्येक निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कक्षात आज सकाळपासून छाननीस प्रारंभ झाला. काही प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी काही आक्षेप नोंदविले होते. मात्र हे सर्व आक्षेप तपासणीअंती फेटाळण्यात आले. आज दिवसभर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ठिय्या दिला होता. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आता रिंगणात १७७ पैकी १३६ उमेदवार आहेत. १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशीच होणार असल्याने अखेरपर्यंत काही अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील कोण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
१७७ पैकी ४१ उमेदवार बाद
By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST