शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

३२ जलस्त्रोत्र कोरडेठाक

By admin | Updated: December 18, 2014 00:34 IST

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस घट होत आहे.

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस घट होत आहे. नोव्हेंबरच्या मध्यंतरातच म्हणजे १७ डिसेंबरअखेर या जिल्ह्यातील ७ पैकी २ मध्यम प्रकल्प व ५७ पैकी ३१ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाने खरीप व रबी पिकांना मोठा तडाखा बसला. पाठोपाठ सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला. विशेषत: आॅक्टोबर अखेरपासूनच जिल्ह्यातील दोन डझन गावांना टंचाईने ग्रासले असून त्या गावांमधून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नोव्हेंबरच्या मध्यंतरापर्यंत हे चित्र आणखीच बिकट बनले आहे. या महिन्यातच ही स्थिती तर उन्हाळ्याच्या तीन-चार महिन्यात काय परिस्थिती ओढवेल, या चिंतेने जिल्हावासियांना ग्रासले आहे. कारण, शहरांसह खेड्या-पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांमधीलच पाणी पातळी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.४जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ७४ टक्के ऐवढा पाणी साठा उपलब्ध आाहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंंबून असणाऱ्या शेकडो खेड्या-पाड्यांचा पाणी पुरवठा जानेवारी अखेरपर्यंत सुरळीत राहिल, असा अंदाज लघु पाटबंधारे खात्याने व्यक्त केला. ४जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, नेर, कुंबेफळ, बदनापूर तालुक्यातील राजेवाडी, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, अंबड तालुक्यातील भातखेडा, खडकेश्वर, घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, चिंचोली, मुसा भद्रायणी, मानेपुरी, मंठातील वाई, तळतोंडी, परतवाडी येथील प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे.४बदनापूर तालुक्यातील अप्पर दूधना प्रकल्प कोरडाठाक आहे. या प्रकल्पात गेल्या दोन वर्षी म्हणजे २०११ साली १७ डिसेंबरपर्यंत ५.९८ टक्के ऐवढा पाणी साठा शिल्लक होता. त्याआधी म्हणजे २०१० साली १२.३७ व २००९ साली २.९४ टक्के पाणी साठा शिल्लक होता. गेल्यावर्षी म्हणजे २०१४ साली या प्रकल्पातील पाणी पातळी ज्योत्याखाली गेली होती. यावर्षी तर या प्रकल्पात भर पावसाळ्यात सुध्दा थेंबभर पाणी साचले नाही.४या जिल्ह्यातील जामवाडी (ता.जालना) लघु प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यापाठोपाठ बदनापूरातील सोमठाणा, अंबड तालुक्यातील डावरगाव, मार्डी, रोहिलागड, कानडगाव, धनगर पिंपरी, टाका, लासूरा हे प्रकल्प कोरडेठाक पडले असून घनसावंगीतील बोररांजणी, मांदळा हे दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत.४जिल्ह्यातील कल्याण मध्यम प्रकल्पात (ता.जालना) १८ टक्के, धामना (ता.भोकरदन) मध्यम प्रकल्पात १६ टक्के व जीवनरेखा (ता.जाफ्राबाद) मध्यय प्रकल्पात २६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पातील पाणी पातळी ज्योत्याखाली पोहोचली आहे.