शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

दुष्काळात २८ हजार नवी कामे !

By admin | Updated: December 1, 2014 00:50 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात कमी पर्जन्य झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे़ त्या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सेल्फवर २८ हजार दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात कमी पर्जन्य झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे़ त्या अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सेल्फवर २८ हजार दुष्काळी कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे़ जिल्ह्यातील ३ लाख लोकांना रोजगार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़मागील दोन वर्षांपासून कमी पाऊस होत आहे. शेती पेराही घटला आहे़ जो पीक पेरा झाला तो अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतकरी पार कोलमडून गेला आहे़ नद्या नाले कोरडेठाक पडले आहेत़ पाणीटंचाई व जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ परिणामी शेती उत्पादनातही मोठी घट झाली आहे़ यासर्व परिस्थितीचे अवलोकन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले असून, जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ९ आॅक्टोबर २०१३ केंद सराकाच्या योजनेनुसार जिल्ह्यात २८ हजार कामे सेल्फवर आहेत़ या अंतर्गत जलसंधारणाच्या कामावर विशेष भर दिला जाणार आहे़ यामध्ये साखळी बांधारा कामे, सलग समतल चर कामे, नाला सरळीकरण, नाला खोलीकरण, जल पनर्रभरण, विहीर खोलीकरण, विहिरीतील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरणाची विविध कामे, इंधन विहिरी घेणे, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, शेतीतील धुरे व्यवस्थित करणे, कुकुट पालन शेड, शेळी पालन शेड, पाणलोटीचे कामे, वृक्ष लागवडीचे कामे, रोपवाटीका , वृक्ष संगोपण, गांडूळ खत निर्मिती यासोबतच रस्ते मजबुतीकरण, अशा प्रकारची विविध २८ हजार कामे सेल्फवर आहेत़ या २८ हजार कामाअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख मजुरांच्या हाताला कामे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ७८७ ग्रामपंचायतींना या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे देऊन रोेजगाराची उपलब्धी ग्रमापंचायती अंतर्गत केली जाणार आहे. ‘मागेल त्याला काम’ दिले जाईल, असे मुख्यकार्यकरी आधिकारी महेश मेघमाळे यांनी समन्वय बैठकीत सांगितले. तसेच या नियोजनाची अंमलबजावणी तात्काळ सूरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी विभाग प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या़ या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, जि़प़ च्या समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, रेणापूर पंचायत सममिती सभापती प्रदीप राठोड, जळकोट पंचायत समितीच्या सभापती सोजरबाई कांबळे, चाकूरचे सभापती करिमसाब गुळवे, यांच्यासह जि़प़चे सर्व गटविकास अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, उप अभियांता, पशुसवर्धन अधिकारी, आरोग्य अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आदींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)