जालना : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी ज्ञान प्रबोधिनी पुणे व येथील जेईएस महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथमच ज्ञान-सेतू प्रकल्पाची सुरूवात केली आहे. यात सहभागी झालेल्या २६ शाळांमधील २७०० विद्यार्थ्यांना ेकार्यशाळेत बल आणि अभासी बलाचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह देण्यात आले. दोन बंद ग्लासमधील चेंडू वेगवेगळे करून दाखविण्यात आले. यासह विविध प्रात्यक्षिकांसह प्रयोग दाखवून त्याचे तज्ज्ञांमार्फत इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही त्यास प्रतिसाद दिला. प्रकल्पाअंतर्गत २६ शाळा दत्तक घेतल्या आहेत. यामध्ये शहरातील जि.प. मुलांची शाळा, जि.प. मुलींची शाळा, कस्तुरबा गाधी बालिका विद्यालय, डग्लस गर्ल्स हायस्कूल, मराठा विद्यालय, जालना तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यालय, सरस्वती विद्यालय, नेत्रदिप विद्यालय, बदनापूर तालुक्यातील शाळा जि.प. प्रशाला शेलगाव, जि.प. प्रशाला बदनापूर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परतूर तालुक्यातील विवेकानंद विद्यालय, ब्राईस्ट स्टार विद्यालय, जि.प. प्रशाला , योगानंद विद्यालय, अंबड तालुक्यातील राजुरेश्वर विद्यालय, मत्स्योदरी विद्यालय, भोकरदन तालुक्यातील मोरेश्वर विद्यालय, जि.प. प्रशाला नळणी आणि जाफराबाद तालुक्यातील जयभवानी विद्यालयाचा समावेश आहे. प्रकल्पाची जिल्ह्याची जबाबदारी पर्यवेक्षक गौतम जगताप, डॉ. अरविंद महाजन, डॉ. यशवंत सोनूने, प्रा. महेश सोनी पार पाडत आहेत. या कार्यकर्त्यांचे प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी कौतुक केले.
२७०० विद्यार्थ्यांना लावली विज्ञानाची गोडी
By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST