शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

रोहित्र जळाल्याने १६ गावे अंधारात

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

आष्टी : परतूर येथील ३३ केव्ही सब स्टेशन मधील ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला शनिवारी अचाकन आग लागल्याने मोठी धावपळ उडाली.

आष्टी : परतूर येथील ३३ केव्ही सब स्टेशन मधील ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला शनिवारी अचाकन आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. परतूर येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून दीड तासानंतर आग आटोक्यात आणली. शनिवारी आष्टी कार्यालयातील ३३ केव्ही सब स्टेशनमधील एका ५ एम.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरला अचानकपणे आग लागली. या सबस्टेशनला परतूर येथील ३२ केव्ही स्टेशनमधुन वीज पुरवठा केल्या जात असून या ठिकाणी ५ एम.व्ही.ए.चे तीन रोहित्र आहेत. त्याअंतर्गत आष्टीसह ३२ गावांना विजपुरवठा केल्या जातो. यापैकी एका रोहित्रास अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. कार्यालयातीन कर्मचाऱ्यांनी परतूर येथेील ३२ केव्हीला कळवून संपूर्ण वीज पुरवठा बंद केला. परतूर नगर परिषदेच्या अग्निशामक दल तीन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या जळालेल्या रोहित्रामध्ये ३७५० लिटर आॅईल होते. याचा प्रसंगी स्फोटही होऊ शकला असता. मात्र प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या रोहित्रावर वाहेगाव, रायगव्हाण, अकोली, ब्राम्हणवाडी, फुलवाडी, आनंदगाव, कोकरीवाडी, ढोळमाळ तांडा, सोपारा, वाहेगाव, पांडे पोखरी, कोकाटे, हादगाव, धामणगाव, आसनगाव आदी १६ गावांना वीज पुरवठा केल्या जातो. दरम्यान या गावांचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती उपअभियंता विश्वनाथ लहाने यांनी दिली. घटनास्थळास तहसिलदार, विनोद गुंडमवार, उपअभियंता विश्वनाथ लहाने, सहाय्यक अभियंता नागरे, आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज गव्हाणे यांनी भेट दिली. याप्रसंगी अग्निशामक दलाचे रवि देशपांडे, अनिल कन्नावे, विजय यांनी शर्थीचे प्रयत्न केले. याप्रसंगी मंठा परतूर महावितरणाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)