उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास २५ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिस व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत भाविकांसह पुजाऱ्यांचीही कडेकोट तपासणी करण्यात येणार आहे़ तसेच बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांसोबतच बोहरच्या जिल्ह्यातूनही दोन हजार पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातूनही भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी येतात. त्या अनुषंगाने विविध मार्गावर संस्था, संघटनांच्या वतीने चहा-पान, नाश्ता आदींची सोय करण्यात येते. तुळजापूृर मंदिर संस्थानच्या खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कंट्रोल युनिटची स्थापना करण्यात येत आहे. मंदिर व परिसरात सुमारे १३२ सीसीटीव्ही कॅमेरे व पीेटीझेड असलेले ५ कॅमेरे बसविण्यात आल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. याबरोबरच मंदिरात पाच ठिकाणी प्रथमोपचार केंद्र, तीन रुग्णवाहीका, तीन अग्निशमन दलांच्या गाड्या चोवीस तास मंदिर परिसरात तन्ौात राहणार आहेत. शिवाय मंदिरातील सर्व पुजाऱ्यांना मंदिरात येताना धोतर, बनियन व पंचा हा पेहराव अनिवार्य करण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही पोलिस व सुरक्षा रक्षकांकडून भाविकांची तपासणी करण्यात येत आहे. याच वेळी भाविकांसोबतच असलेल्या बॅग व इतर साहित्याचीही तपासणी मशीनव्दारे केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान, प्राधीकरणामार्फत तुळजापूर शहरात मोठया प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र या कामांना मागील काही दिवसापासून गती येत नव्हती. नवरात्र महोत्सवात अर्धवट कामांमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ती पूर्ण करण्यात येत आहेत.नवरात्र महोत्सवातील बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच बाहेरून दोन हजार पोलिस कर्मचारी मागविण्यात येणार आहेत. यासाठी वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचीही धामधूम सुरू आहे. त्यामुळे राज्यातून पोलिसांची जादा कुमक उपलब्ध नाही झाल्यास परराज्यातूनही बंदोबस्त मागविला जाईल, असे मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. तसेच गतवर्षी नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये या दृष्टीने प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापुरात तीन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.विद्युत रोषणाई अर्पण४नवरात्र महोत्सवात दरवर्षी भक्ताकडून तुळजाभवानी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येते. यापूर्वी गुलबर्गा येथील बावगी, हैदराबाद येथील शर्मा यांच्याकडून मंदिराला ही रोषणाई केली जात होती. यंदाच्या नवरात्र महोत्सवात उंडाळे व टोळगे या दोन परिवाराकडून श्री तुळजा भवानी चरणी संपूर्ण मदिरासाठीची विद्युत रोषणाई अर्पण करण्यात येत आहे. याची किंमत सुमारे १५ ते २० लाख रुपये असल्याचे मंदीर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या नगरीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात नो पार्कीग व दिशादर्शक फलके लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यापूर्वीच स्थानिक प्रशासनाला दिल्या होत्या. शिवाय तुळजापूर शहरातील वाहनांना आवश्यक स्टीकर्स लावावेत, असेही आदेश दिले होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांकडून अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
मंदिर परिसरात १३२ कॅमेरे
By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST