शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

१३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके

By admin | Updated: June 20, 2014 00:12 IST

देगलूर : तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पासमोर आव्हान उभे ठाकले असून १३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत़

देगलूर : कुपोषण मुक्तीसाठी राबविल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ आरोग्य पोषण योजनेला मिळणारा अपुरा निधी, अंगणवाडी कार्यकर्तींचा संप आदी विविध कारणांमुळे देगलूर तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पासमोर कुपोषित बालकांचे आव्हान उभे ठाकले असून तालुक्यात १३० तीव्र तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत़राज्यातील बालकांचे कुपोषण एकात्मिक पद्धतीने दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांपासून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सुरू केला आहे़ राज्यात चालणाऱ्या गाव, तांडा, वाड्या पातळीवर चालणाऱ्या अंगणवाड्यांच्या मदतीने कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम चालविला जातो़ हा प्रकल्प चालविण्यासाठी काही बचत गटांची आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठासारख्या काही योजनांची मदत होते़ देगलूर तालुक्यात एकूण ११६ गावे आहेत़ तालुक्याच्या ठिकाणचे उपजिल्हा रुग्णालय वगळता हणेगाव, मरखेल, शहापूर या तीन गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ तालुक्यात हणेगाव, बेंबरा, माळेगाव, मरखेल, बल्लूर, खानापूर, शहापूर, तमलूर हे आठ सर्कल आहेत़ या सर्व सर्कलमध्ये २०५ मोठ्या व ४३ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ ८०० लोकसंख्या असेल तर मोठी अंगणवाडी आणि ३०० ते ३५० लोकसंख्येसाठी मिनी अंगणवाडी चालविली जाते़देगलूर तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने मे २०१४ मध्ये तालुक्यातील १७ हजार ८०० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ या तपासणी अभियानात तालुक्यात १३० तीव्र कुपोषित तर ७६४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली़ सर्कलनिहाय आरोग्य तपासणी करण्यात आलेल्या बालकांची व कुपोषित बालकांची संख्या पुढील प्रमाणे- हणेगाव २५१८-१० तीव्र कुपोषित, ८४ मध्यम कुपोषित, बेंबरा १९४२- ४ तीव्र कुपोषित, ८० मध्यम कुपोषित, माळेगाव-१९०२- ३ तीव्र कुपोषित, ४३ मध्यम कुपोषित, मरखेल-२१२८- ४ तीव्र कुपोषित, १०० मध्यम कुपोषित, खानापूर-२२४८- १७ तीव्र, १२३ मध्यम कुपोषित, बल्लूर-२१८८-१८ तीव्र, ६३ मध्यम कुपोषित, शहापूर-२६८९- १३ तीव्र, ६६ मध्यम कुपोषित, तमलूर-२८२९- ३८ तीव्र कुपोषित व १४१ मध्यम कुपोषित आहेत.काही केंद्रांना बचत गटाकडून पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधा, ग्रामपंचायतीकडून मिळणारा अल्प निधी, जानेवारी महिन्यात वेतनवाढीसाठी अंगणवाडी कार्यकर्ती आणि सेविकांनी केलेला संप, तीव्र उन्हाळा, स्थलांतर यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण थोडेसे वाढले असून ते कमी करण्यासाठी तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे वजन वाढण्यासाठी एकात्मिक प्रकलपाच्या माध्यमातून टोनेक्स नावाचे शक्तीवर्धक औषध पाजविण्यात आल्याचे व युद्धपातळीवर प्रमाण कमी करण्यात येईल असे आश्वासन प्रकल्प विस्तार अधिकारी श्रीमती ए़ एम़ हलगे यांनी लोकमतला सांगितले़ (वार्ताहर)