जालना : नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या दीपक पुजारी यांच्याकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ११ सफाई कामगारांवर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. एका लिपिकावर बडतफींच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी गेल्या चार-पाच महिन्यांच्या काळात सफाई कामांना दिलेल्या भेटीमध्ये काही कामगार सातत्याने गैरहजर राहत असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे काही जणांनी स्वत: हजर न राहता अन्य व्यक्तीस कमी रोजंदारीवर कामास ठेवले होते. याबाबत नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी नगरपालिकेच्या प्रशासन विभागाकडून पंचनामाही करून घेतला. (प्रतिनिधी)यासंदर्भात सातत्याने गैरहजर आढळून आलेल्या ११ सफाई कामगारांसह एका लिपिकावर बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव २६ फेबु्रवारी २०१५ रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला होता. त्यामुळे यासंबंधीची कारवाई नवीन मुख्याधिकारी पुजारी यांच्याकडून होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले..कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या ११ सफाई कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या ठरावाला सभेत मंजुरी मिळाली होती. या कामगारांमध्ये कैलास लोखंडे, महिपाल श्रीलल्लू, विष्णू वानखेडे, हिरामण कोरके, लक्ष्मण कांबळे, साजेदाबी सलिमबेग, कमल मुळे, दीपक हिवाळे, गणेश सुतार, संतोष लोखंडे, हरिश्चंद्र लोखंडे तसेच माळीन सिंधूबाई शिरगुळे व लिपिक सचिन मेहरा यांच्यावर या कारवाईची शिफारस करण्यात आली होती.
११ सफाई कामगारांची होणार बडतर्फी
By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST