शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१०० कोटींचा टँकरवाडा!

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

विकास राऊत , औरंगाबाद विभागात दुष्काळाची भीषणता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, मराठवाड्याला मागील तीन वर्षांपासून ‘टँकरवाडा’ अशी उपाधी मिळाली आहे

विकास राऊत , औरंगाबादविभागात दुष्काळाची भीषणता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, मराठवाड्याला मागील तीन वर्षांपासून ‘टँकरवाडा’ अशी उपाधी मिळाली आहे. पाण्याचे स्रोत आटल्यामुळ विभागातील अंदाजे २० टक्के नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. १०० कोटींच्या आसपास टँकरच्या फेऱ्यांवर खर्च होण्याचा अंदाज आहे. पावसाने दडी मारली, तर हा खर्च वाढण्याची शक्यता आहे.मार्चअखेरपर्यंत ४४ कोटी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च झाले आहेत. जून अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विभागीय पातळीवर करण्यात आले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत टँकरवर किती खर्च झाला, याचे गणित प्रशासनाने अजून केलेले नाही. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या रोज वाढत आहे. या आठवड्यात ९५ टँकरची संख्या विभागात वाढली असून, ७० गावे नव्याने टंचाईग्रस्त यादीमध्ये आली आहेत. १,२६५ गावांत व ४५५ वाड्यांमध्ये १,६७२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ( पान २ वर)( पान १ वरून) १५९ सरकारी तर १,५१३ खाजगी टँकर्सवर मराठवाड्यातील वाळवंटी गावांची तहान भागविण्यात येत आहे. घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांमध्ये हाणामारी करण्यापर्यंत वेळ येत आहे. विभागातील अनेक गावांत पाण्यावरून ‘वैर’ निर्माण होणाऱ्या घटना घडत आहेत. दुष्काळाच्या या असह्य झळांचा फटका आबालवृद्धांसह पशुधनालादेखील बसतो आहे. वैराण वाळवंटाप्रमाणे विभागातील प्रकल्प आटले आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करूनही पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. विभागीय आयुक्त म्हणाले...विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट म्हणाले की, विभागातील गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटत आहेत. टँकर हा पाणीपुरवठ्याचा खर्चिक पर्याय आहे; परंतु स्रोत आटल्यामुळे त्या पर्यायावरच अवलंबून राहावे लागत आहे. पेजयल योजनांबाबत विचारले असता ते म्हणाले की, या योजनांचे आऊटपूट काय आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. टँकरसाठी राखीव निधी नाहीये. त्यासाठी कृती आराखडा असतो. मार्चअखेरपर्यंत ४४ कोटी रुपये खर्च टँकर पाणीपुरवठ्यावर झाला आहे. जूनअखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे. जिल्हागावेटँकरऔरंगाबाद३८३५१८जालना२२१२७२परभणी०१२०१७हिंगोली००७००६नांदेड१२९२०३बीड३६२४५१लातूर०५७०७६उस्मानाबाद०९४१२९एकूण१,२६५१,६७२