शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

पाणी व्यवस्थापनाचे शून्य नियोजन

By admin | Updated: February 2, 2016 01:12 IST

चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा फेब्रुवारीच्या प्रारंभीच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा फेब्रुवारीच्या प्रारंभीच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकरी, नागरिक यांना आतापासूनच पाणी टंचाईची झळ बसत असली तरी उद्योगांकडून पाण्याचा उपसा सुरूच असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ११ पैकी सहा सिंचन प्रकल्प कोरडे पडले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून पाणी व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुढे जिल्ह्यात पाणी प्रश्न तोंडचे पाणी पळविणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये वरूणराजाने पाहिजे तशी कृपा दाखविली नाही. पावसाळ्यातील काही महिने कोरडेच गेले होते. ज्यावेळी शेतपिकांना पाणी हवे असायचे, नेमके तेव्हाच पाऊस हुलकावणी द्यायचा. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. २०१४ मध्ये पावसाच्याअभावामुळे शेतकऱ्यांना रडावे लागले. त्यामुळे २०१५ मध्ये तरी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. या आशेवरच शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात मशागतपूर्व शेतीची कामे केली. सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली. शासनाच्या आकडेवारीनुसार मागील पावसाळ्यात केवळ ६० टक्केच वृष्टी झाली. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबरसारख्या थंडीच्या महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. दिना, चंदइ सिंचन प्रकल्प तर जवळजवळ कोरडेच पडले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ धरणापैकी इरई प्रकल्प सोडले तर इतर जलसाठ्यात चिंताजनक जलसाठा शिल्लक आहे. आसोलामेंढा प्रकल्पात ३५.८३ टक्के जलसाठा आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील जलस्रोतही आता आटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागात तलाव, बोड्या, विहिरी, नद्या हेच जलस्रोत आहे. दैनंदिन कामासाठी या जलस्रोतांचाच आधार त्यांना असतो. शेतीला सिंचनही याच जलस्रोताच्या माध्यमातून केले जाते. मात्र फेब्रुवारी महिन्याला प्रारंभ होत असतानाच अनेक ठिकाणी जलपातळी खालावल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यातील इरई, उमा, अंधारी यासारख्या लहान नद्या आटत आहे. वर्धा, पैनगंगा या मोठ्या नद्यांमध्येही मुबलक पाणी नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यभर कुप्रसिध्द आहे. दरवर्षी उष्णतेचा उच्चांक गाठला जातो. मार्च-एप्रिल महिन्यातच ऊन्ह असह्य होऊ लागते. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतरदेखील अनेक गावात पाण्यासाठी हाहा:कार माजतो, असा अनुभव जिल्हावासीयांना नेहमीच येत आला आहे.उलट यावर्षी तर आधीच अत्यल्प पाऊस पडला आहे. नदी-नाले, तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पात फेब्रुवारीमध्येच चिंताजनक जलसाठा शिल्लक आहे. फेब्रुवारी महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा ! मात्र जिल्हा प्रशासनाने याचा विचार करणे अनिवार्य आहे. (शहर प्रतिनिधी)नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठाु उद्योगांकडून पाण्याचा उपसा सध्या धरणातील पाण्याची स्थिती बघता शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे. असे असले तरी उद्योगांना मात्र याच धरणातून पाणी मिळत असल्याची माहिती आहे. पकडीगुड्डम धरणात केवळ १४. ३३ टक्के जलसाठा आहे. तरीही या धरणातून अंबुजा कंपनीला पाणी दिले जात असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेचाही आराखडा नाहीउन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित पंचायत समित्यांकडून माहिती घेऊन संभाव्य पाणी टंचाईबाबत आराखडा तयार केला जातो. त्यानंतर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यासाठी निधीचीही तरतूद केली असते. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना उजाडला तरी जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागात अद्याप संभाव्य पाणी टंचाईबाबत आराखडा तयार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढे जिल्ह्याला भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.