शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कारवाईतील ‘तो’ स्फोटकांचा ट्रॅक्टर गेला कुठे ?

By admin | Updated: February 1, 2016 00:56 IST

येथून १५ किमी अंतरावर सीमेलगत असलेल्या महाराजगुडा येथे तेलंगणा राज्यातून विहीर खोदकामासाठी स्फोटक ...

जिवती : येथून १५ किमी अंतरावर सीमेलगत असलेल्या महाराजगुडा येथे तेलंगणा राज्यातून विहीर खोदकामासाठी स्फोटक साहित्य भरून आलेले ट्रॅक्टर जिवती पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी पकडले. परंतु कारवाई केवळ संबंधित व्यक्तीवर करण्यात आली आणि ट्रॅक्टर सोडण्यात आले. यामुळे सदर कारवाईतील ट्रॅक्टर गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तेलंगणा राज्यातून सध्या जिवती तालुक्यातील काही गावात विहीर खोदकामासाठी स्फोटक साहित्य भरून ट्रॅक्टर आले होते. यामध्ये इलेक्ट्रिक डिटोनेटर, जिलेटीन या स्फोटक वस्तुसोबत बाइंडिंग तार, ब्लास्टिंग बाक्स मशीन हेसुद्धा साहित्य होते. विहीर खोदकाम करीत असताना दगड फोडण्यासाठी या स्फोटक साहित्याचा वापर होतो. मात्र यासाठी ट्रॅक्टर इंजीनचाही वापर केला जातो. ट्रॅक्टर इंजीनला जवळपास ३० ते ४० मीटर लांब पाईप जोडलेला असतो आणि तो पाईप विहिरीत सोडून ज्या ठिकाणी स्फोट घडवायचा आहे, तिथे हवेच्या दाबेने ही क्रिया केली जाते. होस पाईपद्वारे हवेचा दाब देण्यासाठी ट्रॅक्टरचे इंजीन चालू करावे लागते. या सर्व वस्तुंचा परस्परपुरक संबंध असून ट्रॅक्टरवर कारवाई न करता पोलिसांनी ट्रॅक्टर सोडला कसा, असा प्रश्न निर्माण होतो. विहीर खोदकामात स्फोटक साहित्य वापरले जात असले तरी त्यासाठी शासनाचा परवाना असणे आवश्यक असते. परंतु येथे आलेला ट्रॅक्टर व स्फोटक पदार्थाबाबत कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता.सिनु मलेशाम गोलुसुल्ला (२५) रा. ताळीहातनुर ता. उटनुर जि. आदिलाबाद असे ट्रॅक्टरचालकाचे नाव असून त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली आहे. मात्र ट्रॅक्टर सोडून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)