शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

चांदा ते बांदा या रिसोर्स बेस्ड या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रकल्पा राबविण्यात येत आहेत. या योजनेला तीन वर्षे मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. १८ जुन २०१९ रोजी अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावीत जिल्ह्यांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने निधी उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : सीमेवरील वादग्रस्त १४ गावांसाठी विशेष बैठक घेणार, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांसाठी कोणतीही स्थगिती दिली नसून प्रगतिपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. चंद्रपूरसह, गडचिरोली, गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना दिवसा सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.नागपूर अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला गृहमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया व प्रतिभा धानोरकर यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहेल, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वच आमदारांनी जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे जंगलाशेजारील शेतकऱ्यांना जी धोक्यात घालावे लागत असल्याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर उपरोक्त निर्देश दिले.महाकाली मंदिराच्या कामाचा मार्ग मोकळा - मुनगंटीवारसोमवारी नागपूर येथील विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासंबंधी आढावा बैठकीत माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याशी संबंधित विविध विषयांकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. महाकाली मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या संदर्भात दिलेली स्थगिती त्वरित उठविण्याची मागणी त्यांनी केली. चांदा ते बांदा या रिसोर्स बेस्ड या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रकल्पा राबविण्यात येत आहेत. या योजनेला तीन वर्षे मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. १८ जुन २०१९ रोजी अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावीत जिल्ह्यांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने निधी उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेला हुमन सिंचन प्रकल्प काही अडचणींमुळे रखडला. या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेऊन अडचणी दूर करण्याची मागणीही यावेळी केली. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडडाण पुलाच्या बांधकामासाठी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व विषयांसंदर्भात संबंधित विभागांकडूुन माहिती मागवून त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले.आढावा बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी वेधले विविध बाबींकडे लक्षआ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील रेतीचा उपसा थांबल्यामुळे आवास योजनेच्या कामावर झालेल्या विपरीत परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून दिली. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे विविध काम अधिक गतीने पूर्ण व्हावे, यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. ब्रह्मपुरी येथे नवीन एमआयडीसी द्यावी, जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची तातडीने वितरण व्हावे, अशी मागणी केली.आ. सुभाष धोटे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत रखडलेली कामे पूर्ण व्हावी. वनहक्क कायद्यामुळे जुन्या शेतकºयांना वहिवाटीत येत असलेली समस्या सुटावी, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला गती मिळावी. भंडारा प्रकल्प पूर्ण व्हावा. वन्यजीव व मानव संघर्ष यामध्ये लक्ष घालण्याचे तसेच गडचांदूर रेल्वेच्या प्रलंबित मार्गाकडे लक्ष देण्याची विनंती केली. याशिवाय १४ वादग्रस्त गावांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी त्यांनी प्रामुख्याने केली.आ. बंटी भांगडिया यांनी गोसेखुर्द व शिवनाला योजना निधी अभावी रखडला असून घोडाझरी तलावावरील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच नागभीड उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात यावा, नागभीड, तळोधी येथील नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे. भेंडाळा प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली.आ. किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ उड्डाणपुलाची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. या पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. चंद्रपूर शहरासाठी इरई धरणाशिवाय पाणीपुरवठ्यासाठी धानोरा धरणाची निर्मिती व्हावी. अमृत योजनेला गती मिळावी. महाकाली मंदिर व क्रीडा संकुलाचे थांबलेले बांधकाम निधी देऊन गतिशील करण्यात यावे, जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध पुरवठा नियमित व्हावा, आरोग्य विभागातील पदभरती व्हावी, औद्योगिक जिल्हा असतानासुद्धा वेगळे कामगार आयुक्त नसल्यामुळे होणारी हेळसांड थांबवावी. याच जिल्ह्यासाठी हे पद द्यावे,अशी मागणी केली.आ. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती, वरोरा येथील समस्या मांडल्या. वरोरा येथील दिंडोरा बॅरेज पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, (सीटीपीएस) प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्याची मागणी केली. यासोबतच ग्रामीण भागाची आवश्यकता असणाºया तलाठी पदांना मुख्यालयी राहणे अनिवार्य करावे, या मागण्या मांडल्या.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार