शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

सिंदेवाही तालुका औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 21, 2016 00:42 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगरहित परिसर म्हणून सिंदेवाही तालुक्याची ओळख आहे.

बेरोजगारांच्या हाताला हवे काम : परिसराच्या आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगाची गरजबाबुराव परसावार  सिंदेवाहीचंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगरहित परिसर म्हणून सिंदेवाही तालुक्याची ओळख आहे. या तालुक्याची लोकसंख्या एक लाख १५ हजार आहे. या तालुक्यात मुख्य व्यवसाय भात शेती असून ७५ टक्के जनता शेतकरी व शेतमजूर आहेत. धानाचे एक पीक घेतल्यानंतर रिकामे राहण्याची पाळी येथील नागरिक व शेतकऱ्यावर येते. सिंचन सोयीचा अभाव व तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे युवकामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तालुका अनेक सोई-सवलतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्याचा विकासच खुंटल्याचे दिसून येत आहे.सिंदेवाही तालुक्यात मुख्य पीक भाताचे (धान) असून त्यावर शेतकरी आपली उपजिविका चालवितात. मात्र सिंचनाच्या सोयीअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. तालुक्यातील काही रस्ते अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. सिंदेवाही-चिमूर हा राज्यमार्ग आहे. परंतु त्याच्या दुरुस्तीचे व रुंदीकरणाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांची फौज मोठ्या प्रमाणात वाढत असून कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग नसल्याने बेरोजगाराच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेरोजगाराची समस्या गंभीर बनली आहे. उद्योग नसल्याने युवक अवैध व्यवसायाकडे वळले आहेत. ही चिंताजनक बाब आहे.बांबू उद्योगसिंदेवाही तालुक्यात शिवणी वनपरिक्षेत्रात घनदाट जंगल असून या परिसरात बांबू फार मोठ्या प्रमाणावर आहेत. या परिसरात मोहाळी नलेश्वर, जामसाळा, कुकडहेटी, कळमगाव, विरव्हा, वासेरा, शिवणी, कारवा या गावातील हजारो गरीब मजूर बांबूपासून बोरे, ताटवे, टोपल्या, सूप, चटया तयार करून आपली उपजिविका करीत आहेत. परंतु वनविभागाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हा बांबु उद्योग मोडकळीस आला. पूर्वी या उद्योगाची सिंदेवाही येथे बाजारपेठ होती. बैलगाडीने हा माल सिंदेवाही येथे येत होता. येथून ट्रकद्वारे व रेल्वेद्वारे हा माल नागपूर, अकोला, अमरावती येथे जात होता. या उद्योगामुळे गरीब मजुरांना काम मिळत होते. परंतु वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे या परिसरातील बांबु उद्योग बंद पडलेला आहे. सहकारी तत्वावर हा बांबु उद्योग सुरू केल्यास अनेक ग्रामीण मजुरांना काम मिळू शकते. शिवणी वनपरिक्षेत्रात मुबलक बांबू आहे. हा बांबू इतरत्र पाठविण्यापेक्षा या परिसरातच प्लायवुड किंवा कागद कारखाना (लहान युनीट) सुरू होऊ शकतो. या परिसरातून बोकडी व उमा नदी वाहते. मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.औद्योगिक वसाहतशासनाने औद्योगिक धोरणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे जाहीर केले. त्यानुसार सिंदेवाही ते नवरगाव रोडवर औद्योगिक वसाहतीचा बोर्ड लागलेला आहे. या वसाहतीत पाच एकर जागा उपलब्ध आहे. परंतु या वसाहतीमध्ये एकही उद्योग सुरू करण्यात आले नाही. ज्यांनी उद्योग लावले, तेही बंद अवस्थेत आहे. सध्या या वसाहतीमध्ये इंडीयन गॅसचे गोडावून आहे. इतर कोणतेही नवीन लघुउद्योग सुरू झाले नाही. सिंदेवाही तालुक्यात राईस मील व पोहा मील आहेत. पण त्यात पाहिजे तेवढा रोजगार उपलब्ध होत नाही. या परिसरात वनावर आधारित उद्योग, कागद कारखाना, तेल गिरणी, औषधी निर्मिती, पर्यटनावर आधारित उद्योग, लोह खनिजावर आधारित उद्योग सुरू होऊ शकतात. सिंदेवाही येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येथे भात संशोधन केंद्र, कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र सुरू आहे. सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ निर्माण झाल्यास या परिसरातील शेतमजूर, बेरोजगार युवक व महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी अजूनपर्यंत तालुक्यातील शेतजमिनीला मिळाले नाही.उद्योगाअभावी बाजारपेठेवर परिणामया तालुक्यात उद्योग नसल्याने या परिसरातील नागरिकांचे जगणे शेतीवर निर्भर आहे. शेतीच्या उत्पादनावरच या भागातील बाजारपेठाचे आर्थिक व्यवहार चालते. यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठ व व्यापारावर परिणाम झाला. त्यामुळे या परिसरात उद्योगाची निर्मिती होणे आवश्यक आहे.- रमेश बिसेन, अध्यक्ष, व्यापारी संघटना, सिंदेवाहीकृषी विद्यापीठाची आवश्यकतातालुक्यात उद्योग निर्माण झाल्याशिवाय व्यापार व बाजारपेठ वृद्धींगत होणे अशक्य आहे. बाजारपेठेला संजीवनी देण्यासाठी या परिसरात उद्योग येणे गरजेचे आहे. येथील औद्योगिक विकास व कृषी विद्यापीठ निर्माण झाल्यास बाजारपेठेला बळकटी येईल व युवकांना रोजगार मिळेल.- राजकुमार धामेजा, प्रतिष्ठित व्यापारी, सिंदेवाही