शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आजारमुक्तीसाठी प्रभावी आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:03 IST

जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त व जलजन्य आजारमुक्त करण्यासाठी अधिकाºयांनी आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत गुरूवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा विकास समन्वय, सनियंत्रण बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त व जलजन्य आजारमुक्त करण्यासाठी अधिकाºयांनी आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत गुरूवारी ते बोलत होते.यावेळी खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक चंद्र्रकांत वाघमारे उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती आटोक्यात असली तरी पुरेशी नाही. जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त कसा करता येईल, याचे नियोजन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी करावे. निधीची कमतरता नाही. प्रधानमंत्री खनिज विकास, सीएसआर, डीपीसीमधून विकास कामांकरिता भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी वेळेत खर्च करणे गरजेचे आहे. सर्व ग्रामपंचायतींना आरओ वॉटर एटीएममधून जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येऊ शकते. त्यामुळे संपूर्ण जिल्हा जलजन्य आजाराने मुक्त होण्यास मदत होईल, अशा सूचनाही अधिकाºयांना दिल्या. रुग्णालयात औषधीच्या पुरवठ्यासाठी निधीची कमतरता नाही. प्रधानमंत्री खनिज विकासाच्या माध्यमातून निधी देता येऊ शकेल काय, याची पडताळणी करण्याच्या सूचनाही ना. अहीर यांनी जिल्हाधिकाºयांना केल्या. बचतगट, शेतकरी मेळावा व आरोग्य मेळाव्याचे आयोजन येत्या डिसेंबरच्या आत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाटण, जिवती, वनसडी, खातोडा, बाळापूर येथील बँका शेतकºयांना सहकार्य करित नसल्याचे समितीचे सदस्य खुशाल बोंडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी खेमणार यांनी सविस्तर अहवाल तयार करून संबंधित बॅकांच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना ना.अहीर यांनी दिल्या. यावेळी समितीचे तुळशिराम श्रीरामे, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.