शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:41 IST

गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची मोहीम । पिकांवरील कीडनियंत्रणासाठी जहाल औषधांऐवजी सेंद्रिय फवारणी करण्यास प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अशा घटना यंदाच्या हंगामात घडू नये, यासाठी विभागीय कृषी कार्यालयाने जिल्ह्याला ४०० मेट्रीक टन निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट्य दिले. कृषी विभागाने निंबोळी गोळी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कोरपना, राजुरा, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यातील कापूस, सोयाबिन पिकांवर विविध कींडींचा प्रादूर्भाव झाला होता. शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी आरोग्याची काळजी न घेता जहाल औषधांचा सर्रास वापर केला. त्यामुळे शेतकºयांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाल्याच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यातील २२ शेतकरी विषबाधेने दगावले. जिवती व कोरपना तालुक्यातील काही शेतकºयांना जहाल औषधांची लागण झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. यंदा हा प्रकार घडू नये, याकरिता कीडनिवारणासाठी निंबोळी अर्काच्या फवारणी करण्यास शेतकºयांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय विभागीय कृषी कार्यालयाने घेतला. त्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट दिले. चंद्रपूर जिल्ह्याकरिता ४०० मेट्रीक टन निबोंळी अर्क तयार करण्यात येणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय गावामध्ये मोहीम सुरू करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मोहीम अधिकारी शेतकºयांना निंबोळी अर्काचे महत्त्व समजावून सांगत आहेत. कीडीचे लक्षणे दिसल्यास शेतकºयांनी थेट रासायनिक औषधांची फवारणी न करता सेंद्रिय फवारणीचा पर्याय स्वीकारावा, हे समजावून सांगण्यात येत आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकºयांना शिवारातच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शेतकºयांनी संभाव धोका लक्षात घेऊ न या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी दर्शविला आहे.अशी घ्यावी दक्षतानिंबोळी अर्कापासून गोळी तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. कीडनियंत्रणासाठी घटक कोणते, त्याचा वापर कसा करावा, पीकनिहाय संभाव्य रोग याविषयी कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. गतवर्षी जागृतीअभावी रासायनिक फवारणीचा अतिरेकी वापर झाला होता. फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळी अर्कापासून द्रावण तयार करावे. परंतु हे द्रावण तयार करून साठवून ठेवू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सेंद्रिय शेतमालास प्राधान्यनिंबोळी अर्काच्या फवारणीमुळे केवळ कीडींचे नियंत्रण होत नाही तर सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला चालना मिळते. आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी फवारणी पिकांच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांनी कीडनाशक द्रव तयार करणाºया कंपन्यांच्या भुलथापांना बळी न पडता सेंद्रीय शेतमालाला पूरक निंबोळी अर्काची फवारणी करावी, अधिकाºयांंचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.