शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांची संख्याही चढतीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST

१ मार्चपासून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या चढतीवरच असल्याने यापुढे नागरिकांना मोठी खबरदारी पाळावी लागणार आहे. कोविड-१९ व्हायरस व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या ...

१ मार्चपासून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या चढतीवरच असल्याने यापुढे नागरिकांना मोठी खबरदारी पाळावी लागणार आहे.

कोविड-१९ व्हायरस व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. बऱ्याच संक्रमित व्यक्तींमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून येतात. अशा व्यक्तींनाही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सामान्य लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला, थकवा, कमी सामान्य लक्षणात ठणका व वेदना होणे, घसा खवखवणे, जुलाब होणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, चव किंवा गंध न कळणे आदी लक्षणे दिसून शकतात. गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यात त्रास होणे किंवा श्वास लागणे, छातीत दुखणे, दबाव येणे, बोलता न येणे किंवा हालचाल करता न येणे आदी गंभीर लक्षणे मानली जातात. अशा व्यक्तींनी तातडीने आरटीपीसीआर अथवा अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दिला जात आहे.

‘अर्ली डिटेन्शन’ टाळणार पुढचा धोका!

एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यामध्ये लक्षणे दिसून येण्यासाठी सुमारे पाच ते सहा किंवा १४ दिवसदेखील लागू शकतात, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दररोज अडीच हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर आणि दोन हजारहून अधिक अ‍ॅन्टिजेन अशा एकूण चार हजार ५०० चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी ाुग्णाचा लवकर शोध (अर्ली डिटेन्शन) घेऊन उपचार करणे म्हणजे पुढील संसर्गालाही तात्काळ प्रतिबंध घालणे होय. सध्या तरी जिल्हा आरोग्य यंत्रणा हेच सूत्र वापरत असल्याचे दिसून येत आहे.

चार हजार चाचण्यांचा अहवाल ‘वेटिंग’वर

जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत झालेल्या चार हजार आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल जाहीर झाला नाही. शिवाय, ७५९ अहवाल प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस कोरोनाचा दैनिक पॉझिटिव्ह रेट ०१ होता. सध्याचा प्रगतीपर रेट १२.६ वर पोहोचला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली नाही तर मोठे संकट उद्धभण्याचा धोका आहे.

आता १९ ते ४० वयोगटात रुग्णवाढ

जिल्ह्यातील २६ हजार ७०१ कोरोना रूग्णांमध्ये १९ ते ४० वयोगटात आता झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. आतापर्यंत ११ हजार ४८५ बाधित झाले. ० ते ५ वयोगटात ४१४, ६ ते २८ वयोगटात २ हजार २०२, ४१ ते ६० वयोगटात ९ हजार ३२९ तर ६१ वर्षांवरील ३ हजार २७१ जण बाधित झाले आहेत.

लक्षणनिहाय कोविड रुग्ण (२६ मार्चपर्यंत)

लक्षणे नसलेले २७८

मध्यम - ९४

सौम्य -२१७

गंभीर -२५

ऑक्सिजनवर -९२

व्हेंटिलेटरवर -०६

आयसीयूमध्ये -४७