शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपवर महावितरणच्या बिलिंग एजंटची कार्यशाळा

By admin | Updated: July 30, 2016 01:29 IST

महावितरण मोबाईलवर ग्राहकोपयोगी, असे मोबाईल अ‍ॅपसुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचाही सहभाग : वीज कंपनीने विकसित केले तंत्रज्ञान चंद्रपूर : महावितरण मोबाईलवर ग्राहकोपयोगी, असे मोबाईल अ‍ॅपसुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू करण्यात आले आहे. त्यावर कार्यशाळा घेण्यात आली. विजेसंबंधीच्या सेवा ग्राहकांना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महावितरणच्याच माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारा ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अ‍ॅप, नवीन कनेक्शन अ‍ॅप, टीटर रीडिंग अ‍ॅप, कर्मचारीमित्र अ‍ॅप, लोकेशन कॅप्चर अ‍ॅप या चार मोबाईल अ‍ॅपचा वापर महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्याद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन गडचिरोली मंडळ, चंद्रपूर मंडळ, वरोरा विभाग, चंद्रपूर विभाग तसेच इतर विभागातही करण्यात आले. चंद्रपूर येथे झालेल्या कार्यशाळेस मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी स्वत: मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे उपस्थित होते. चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अर्चना घोडेस्वार व प्रणाली विश्लेषक पंकज साठोने यांनी मोबाईल अपच्या वापराबद्दल सखोल माहिती व प्रशिक्षण दिले. कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अ‍ॅप, नवीन कनेक्शन अ‍ॅप, मीटर रिडिंग अ‍ॅप, कर्मचारीमित्र अ‍ॅपया सर्वांची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अ‍ॅप महावितरणच्या अभियंते व जनमित्रांना त्यांच्या कामासाठी फिरावे लागते आणि सर्वेक्षण करावे लागते. फिल्डवर काम करताना अनेक महत्त्वाच्या नोंदी करावयाच्या असतात. आता या नोंदी कागदावर न करता थेट मोबाईल अ‍ॅपमधून केल्याने वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. नवीन कनेक्शन अ‍ॅप उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील सर्व कनेक्शन या अ‍ॅपद्वारे देता येतात. सर्वेक्षणानुसार किती पोल व वायरची गरज आहे. मिटर क्रमांक आदी नोंदवता येतो. तांत्रिक कारणांमुळे एखादे कनेक्शन देता येत नसेल तर त्याचे सबळ कारण अ‍ॅपमध्ये नोंदवावे लागेल. तसेच अभियंत्यास त्याच्या क्षेत्रातील प्रलंबित कनेक्शनची संख्याही त्यात दिसेल. मीटर रिडिंग अ‍ॅप हे अ‍ॅप जनमित्रांसह रीडिंग घेणाऱ्या एजन्सीसाठीही उपयुक्त आहे. रिडिंगचा फोटो काढून अ‍ॅपपवर लोड करावा लागतो. मोबाईलद्वारेच हे काम होत असल्याने वेगळ्या कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. आॅपरेटर व अभियंते त्यांच्याकडील फीडर, रोहित्र व ग्राहकांचे मीटर रीडिंग या अ‍ॅपद्वारे करु शकतील. मिटर रिडींग घेताना अक्षांश-रेखांशासह लोकेशन नोंदवले जात असल्याने रिडींगसाठी प्रत्यक्ष जाणे आवश्यक असणार आहे. कर्मचारी मित्र अ‍ॅप तातडीच्या तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद करणे आवश्यक असल्यास शाखा अभियंता त्याची नोंद अ‍ॅपपमध्ये करेल. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्यांना मोबाईल संदेश पाठविण्याचीही सोय अ‍ॅपमध्ये केली आहे. वीज बंद ठेवण्याचे नेमके कारण समजल्यामुळे ग्राहकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. त्यामध्ये भार व्यवस्थापन, लोकेशन कॅप्चर, फीडर रीडिंग प्रभावीपणे करता येईल. लोकेशन कॅप्चर अ‍ॅप या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांची रीडींग घेणाऱ्यास त्या ग्राहकाच्या भौगोलिक स्थानाचा तंतोतंत पत्ता, त्यांच्या शाखा कार्यालयाचा पत्ता, त्याचे विभागीय कार्यालय कोणते आहे आदी माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.