शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची केविलवाणी थट्टा

By admin | Updated: November 5, 2015 01:16 IST

अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १९८२ पासून

चंद्रपूर : अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १९८२ पासून विशेष घटक योजना राबविली जात आहे. शेतीशी संबंधित बाबी या योजनेतून अनुदानावर पुरविल्या जातात. यासाठी मृद संधारण व नाबार्डच्या निकषानुसार १०० टक्के अनुदान दिले जाते. १९८२ पासून लावण्यात येणाऱ्या या निकषात आता बदल होऊन वस्तू व साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत. असे असतानाही १०० टक्के अनुदानाच्या नावाखाली अतिशय तोकडे सहाय्य केले जात आहे. त्यामुळे ही विशेष घटक योजना गरीब शेतकऱ्यांची थट्टा करणारी ठरली आहे.अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविणाऱ्या या विशेष घटक योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण व शेतीची सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी किंवा रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहिर दुरुस्ती, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहिर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार ठिबक संच, ताडपत्री या बाबींसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावे सहा हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे व ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्या मर्यादेत आहे, असे आदिवासी व अनुसूचित जाती शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती असते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी हे सदस्य असतात. विशेष घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी बाबी पुरविण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जात आहे. यासाठी मृत संधारण व नाबार्डचे निकष वापरले जात आहे. मात्र सद्यस्थितीत महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतीसंबंधी साहित्याच्या व इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान दिले जात असले तरी प्रतक्षात ते ५० टक्केही नाही. त्यामुळे अटीनुसार ५० हजाराच्या मर्यादेत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेताना स्वत:चे लाखो रुपये लावावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाची ही योजना मागास व गरीब शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)शासनाने योजनेत बदल करावा४राज्य शासनाने सध्याची महागाई लक्षात घेता या विशेष घटक योजनेत बदल करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबत चंद्रपुरातील कृषी विभागानेही काही महिन्यापूर्वी शासनाला एक पत्र पाठवून अनुदान राशीत वाढ करण्याची मागणी केली आहे. यावर अद्याप शासनाने गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही.१०० टक्क्याच्या नावाखाली तोकडे अनुदान४सध्या महागाई वाढली आहे. राज्य शासनाकडून ज्या बाबीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते, ती बाब तेवढ्या अनुदानात पूर्णत्वास जात नाही. उदाहरणार्थ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीरीसाठी ७०,००० ते १,००००० रुपये अनुदान दिले जाते. मात्र प्रत्यक्षात विहीर बांधकामासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाखांचा खर्च येतो. अडीच लाख रुपये स्वत:जवळचे वापरावे लागत असल्याने शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून येत नाही.१०० टक्के अनुदान व प्रत्यक्षात खर्च४पीक संरक्षण व शेतीची सुधारित अवजारे १०,००० रुपये अनुदान मात्र खर्च एक लाखाहून अधिक४बैलजोडी किंवा रेडेजोडी ३०,००० रुपये अनुदान, मात्र खर्च १ ते दीड लाख४बैलगाडी १५,००० रू अनुदान; मात्र खर्च ७० ते ८०,००० रु.४इनवेल बोअरिंग २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ४०,००० रू.४पाईप लाईन २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ५०,००० रु.४पंपसंच २०,००० रू अनुदान; मात्र खर्च ५०,०००रू.४नवीन विहीर ७०,००० ते १ लाख रू अनुदान; मात्र खर्च साडेतीन लाख४शेततळे ३५,००० रू अनुदान; मात्र खर्च ७०,००० रू.४तुषार व ठिबक सिंचनसंच पुरवठा २५,००० रू अनुदान; मात्र खर्च ६०,०००