चंद्रपुरात बैठक : राज्य ग्राहक सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यामध्ये ग्राहक चळवळ व या संदर्भातील कायदे सक्षम आहेत. मात्र पुरेशी प्रसिद्धी आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीमध्ये सातत्य आल्यास ग्राहकांना उत्तम सुविधा मिळेल. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य ग्राहक सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केले.जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अन्न व प्रशासन, शिक्षण, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक वितरण आदी विविध विभागांचा आढावा घेतला. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायदा, राईट टू सर्व्हिस अॅक्ट या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. वर्षातून किमान दोन बैठका अध्यक्षांच्या नेतृत्वात व्हाव्यात व समितीच्या मार्फत येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांचे निरसन काटेकोरपणे करण्यात यावे. यासाठी प्रशासनाने हयगय करु नये, असे अरुण देशपांडे यांनी सांगितले.सरकारी रुग्णालयामध्ये प्रसूती व अन्य आरोग्य तपासणीसाठी नागरिकांचा कल वाढावा आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व सुजान नागरिकांनी लक्ष वेधावे असे आवाहन त्यांनी केले. शालेय पोषण आहाराचा पुरवठा नियमित व्हावा, शाळेमध्ये टीसी देण्यासाठी कोणत्याच परिस्थीत शुल्क आकारल्या जावू नये, शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये वाढ व्हावी तसेच पुस्तके, गणवेश यासाठी शाळांनी नेमक्या दुकानांची अनिवार्यता लादू नये, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. नियमांना न जुमानणाऱ्या शाळांवर कार्यवाही करण्यात यावी, रेशन कार्डमधील पारदर्शता, रेशन कार्ड आधार कार्डला जोडणे, बायोमेट्रीक मशीनचा वितरणात वापर, आदी वितरण व्यवस्थेतील बदलावरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सुधीर मिसार व ग्राहक चळवळीतील सदस्य उपस्थित होते.हॉटेलची तक्रार करण्यासाठी व्यवस्था हवी शहरातील सर्व हॉटेलमध्ये खाद्य पदार्थाविषयी तक्रारी असल्यास सामान्य नागरिकांना लगेच तक्रार करता येईल, यासाठी दर्शनी भागामध्ये ग्राहकांसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री नंबर लावणे बंधनकारक करावे, असे, निर्देश त्यांनी दिले. याशिवाय प्रत्येक परवानाधारक हॉटेलमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा करणे संबंधीत हॉटेल, रेस्टारेंट यांना बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही केली जाते. तेव्हा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत याबाबतची माहिती पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. बर्फ उद्योगांवर कारवाई कराजिल्ह्यातील बहुतांश बर्फ उद्योग करणारे व्यवसायिक यांच्याकडे अखाद्य बर्फ निर्मिती या गटात उत्पादन केले जाते. त्यामुळे अशा बर्फ उद्योग समुहाकडून तयार झालेला बर्फ वापरणाऱ्या हात ठेलेधारक, हॉटेल व्यवसायिक यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी केले.
ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश
By admin | Updated: June 18, 2017 00:35 IST