शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीच तर कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोविड १९  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी  सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, असा इशारा माध्यमांमध्ये दिला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा प्रश्न : २५०० ऑक्सिजन बेड्स, ८५० आयसीयू व ४२५ व्हेंटिलेटरचे नियोजन

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या घसरू लागल्याने नागरिक निश्चिंत होऊन दैनंदिन व्यवहारात गुंतले असतानाच आता नव्या चिंतेने भर टाकली. गत दोन आठवड्यांपासून कोविड रुग्णांची संख्या दररोज १५ पेक्षा जास्त होऊ लागली. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध कायम असतानाच रुग्णवाढ होत असल्याने दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कशी आहे, हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोविड १९  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी  सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, असा इशारा माध्यमांमध्ये दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बाधितांचे जीव वाचविणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थितीच येऊ नये. सौम्य अथवा लक्षणविरहित रुग्णांवर घरच्या घरी तसेच गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणे,  अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक  लसीकरणासाठी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडून नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे. 

लहान मुलांसाठीही केअर सेंटर  - तिसऱ्या लाटेचा अंदाज गृहीत धरून लहान मुलांसाठीही केअर सेंटर्स सज्ज ठेवण्यात आले. म्युकरमायकोसिसचाही धोका वाढू नये, यासाठी हॉस्पिटल्समध्ये विशेष कक्ष तयार आहेत. तालुकास्थळ व नगरपंचायत स्तरावर ऑक्सिजन प्लांटसाठी नुकत्याच निविदा प्रकाशित करण्यात आल्या

तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या  २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज ?- तिसऱ्या लाटेची  सध्या तरी शक्यता नाही. मात्र, लाट आलीच तर रुग्णांची संख्या सुमारे २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे.- त्यानुसार कोविड केअर सेंटरमध्ये ९ हजार रुग्ण राहू शकतात. २५०० ऑक्सिजन बेड्स, ८५० आयसीयू तर ४२५ व्हेंटिलेटर बेड्स लागू शकतात. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करून ठेवण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमतासध्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची,  क्षमता आहे. १ हजार ३०० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्स १०५ आहेत. त्यातील ९४ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. जिल्ह्यातून ५० व्हेंटिलेटर आयुक्त ८० व्हेंटिलेटर  वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यापैकी २४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. कोविड उपायांबाबत  प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.

५६.३४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध  शासनाने सूचविल्याप्रमाणे लिक्विड  ऑक्सिजनची ५७ मेट्रिक टन गरज असून सध्या ५६.३४ मेट्रिक टन उपलब्ध आहे. पीएसए ऑक्सिजन १६ मेट्रिक टन हवा तो आता १५ मेट्रिक टन आहे. सिलिंडर ऑक्सिजन ८ मेट्रिक टन पाहिजे सध्या १० मेट्रिक टन उपलब्ध आहे. जम्बो केअर सेंटरमध्ये २०० बेड्स, पॉलिटेक्निकमध्ये २०० तर ग्रामीण रुग्णालयात ४७५ वाढीव बेड्स उपलब्ध होतील. मूल येथे ५० बेड्सची पाइपलाइन अंतिम टप्प्यात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या