शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

हजारो विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:17 IST

जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्याचा कथित पारदर्शी निर्णय यंदाही कागदावरच राहण्याची चिन्हे दिसत आहेत़ समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला ४ कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ येत्या मंगळवार (दि़ २६ ) पासून शाळा सुरू होणार आहे़ मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या आनंदी बालमनाचा हिरमोड झाला आहे़

ठळक मुद्देजि़पक़डे निधीच नाही : गणवेशाविनाच वाजणार शाळांची घंटा

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्याचा कथित पारदर्शी निर्णय यंदाही कागदावरच राहण्याची चिन्हे दिसत आहेत़ समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला ४ कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ येत्या मंगळवार (दि़ २६ ) पासून शाळा सुरू होणार आहे़ मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या आनंदी बालमनाचा हिरमोड झाला आहे़जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना थेट गणवेश न देता त्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम देण्याची योजना राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षापासून सुरू केली़ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत सर्वच समुदायातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषदांनी राज्य शासनाच्या निधीव्यतिरिक्त पर्यायी मार्ग शोधण्याचेही निर्देश देण्यात आले होते़ चंद्रपूर जिल्हा परिषदेने आर्थिक पर्याय उभे करून सर्वांना गणवेश देण्याचा दावा केला होता़ परंतु, मागील सत्रात शेकडो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला़ शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात आली होती़ पाल्यांच्या वाट्याला उपेक्षा येवू नये़ शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा आत्मविश्वास कायम राहावा, यासाठी पाल्यांनी पदरमोड करून गणवेश खरेदी केले होते़ यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू व्हायला अवघे चार दिवस शिल्लक असताना जि़ प़ ने राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीवरच मदार ठेवली़त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून नवा गणवेश परिधान करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालमनाला यंदाही हिरमुसण्याची वेळ येणार आहे़योजनेच्या स्वरूपाविषयी संभ्रमजि़ प़ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेला शालेय गणवेशाची रक्कम शासनाकडून दिली जात होती़ पालकांनी गणवेश खरेदी केल्याचे बिल दाखविल्यानंतर मुख्याध्यापकांकडून संबंधित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत वापरण्यात आली होती़ या पद्धतीविषयी राज्यातील काही जागृत पालकांनी आक्षेप नोंदविल्याने सुधारीत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे़ नवा आदेश नसल्याने रक्कम वाटपासंदर्भात सध्या काही सांगता येणार नाही, असेही बोलले जात आहे़निधी आल्यानंतरच वाटप करूशालेय गणवेशाचा निधी अद्याप मिळाला नाही़ गणवेश वाटपाचे स्वरूप मागील सत्राप्रमाणेच राहणार आहे़ निधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वळते करण्यात येईल़-प्रकाश लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)