शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली.

हवालदिल : हवामान खात्याच्या अंदाजाने नुकसानवरोरा: मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. हवामान खात्यानेही पाऊस येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र आता त्यांना पावसाअभावी बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षीपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वारंवार मे महिन्यात वर्तविला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हातातील कामे बाजूला सारून शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले. बियाणांची वेळेवर टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बियाणे घेऊन ठेवले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक गावात चांगला पाऊस पडला.आता आपल्याकडेही पाऊस बरसणार, असे गणित लावून शेतकऱ्यांनी घरी घेऊन ठेवलेले कपाशी, तूर व सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करुन टाकली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पहिल्या पावसात जमिनीत गेलेले बियाण्यांचे जमिनीवर कोंब आले. त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कोंब वाळत चालले आहे. काही बियाणे जमिनीतच राहिल्याने खराब झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस झाला नाही, ते बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)