शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटली आसवं!

By admin | Updated: August 25, 2016 00:39 IST

शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे.

२० दिवसांपासून पाऊस बेपत्ता : फळधारणेवर आलेल्या पिकांना पावसाची आवश्यकताप्रकाश काळे गोवरीशेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव असल्याने अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने फळधारणेवर आलेले पीक वाळायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आसवं दाटल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज क्षणाक्षणाला वाईट होत चालली आहे. सिंचनाचा अभावामुळे अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु निसर्गही आता लहरीपणाने वागायला लागल्याने ‘पाऊस येऊनही बुडवेल अन् जाऊनही बुडवेल’ अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. तब्बल महिनाभर पाऊस उशीरा आला. त्यामुळे उसनवारी व कर्ज काढून जमिनीत टाकलेले बियाणे अपुऱ्या पावसाने उमलण्यापूर्वी कोमेजून गेले. बहुतांश शेतकऱ्यांना त्यावेळी दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. यातून बळीराजा अद्यापही सावरला नाही. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकऱ्यांजवळ दमडीही शिल्लक नाही. जुलै महिना वगळता जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणाऱ्या निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. सध्या सोयाबिन पिकाचा फळधारणेचा काळ आहे. यावेळी पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असते. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. तर फळधारणेवर आलेले सोयाबिनचे पीक उभ्यानेच वाळायला लागले आहे. शेतकऱ्यांची अवस्था क्षणाक्षणाला वाईट होत चालल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. मग हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच उपस्थित होत आहे. बळीराजाचे आभाळाकडे डोळेगोंडपिपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने येथील शेतपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धात मुसळधार पडणाऱ्या पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून तालुक्यात ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. पावसाची अनियमितता व शेतपिके उभे असताना शेतपिकांना बसलेला वादळी फटका यामुळेही शेती व्यवसायावर चांगलाच आघात झाला. यावर्षी मध्यल्या काळात पावसाने दमदार हजेरी लावली. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, पिकासाठी पेरणी केली. मात्र पावसाचा जोर वाढतच गेल्याने प्रथम पेरणी जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिमतीने दुबार पेरणी व धान पऱ्हे टाकले. सध्यास्थितीत शेतपिके उभी असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उभ्या शेतपिकावर रोगराईचे संकट ओढावले आहे. धान पिकांसह सोयाबीन व कापूस पिकांवरही विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर पीक नष्ट होणार या भितीमुळे ग्रामीण भागात परंपरागत दवे करणे, घट मांडणे आदी कार्यांना सुरुवात झाली असून बळीराजाचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)