शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:18 IST

मकर संक्रांत म्हणजे महिलांचा उत्साहाचा आनंददायी सण... या सणाला महिला एकमेकींना वाण म्हणून वस्तूंची भेट देतात.

ठळक मुद्देमकरसंक्रात उत्सव : प्लॉस्टिकऐवजी जीवनोपयोगी वस्तु खरेदीला प्राधान्य

राजेश मडावी ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मकर संक्रांत म्हणजे महिलांचा उत्साहाचा आनंददायी सण... या सणाला महिला एकमेकींना वाण म्हणून वस्तूंची भेट देतात. गोड-धोड पदार्थांचा आनंद चाखतात. ही परंपरा मराठी संस्कृतीत कायमची रूजली आहे. यापूर्वी वाण म्हणून प्लॉस्टिक वस्तू भेट दिली जायची. मात्र, आता संसारोपयोगी स्टील आणि अन्य वस्तू देण्याची परंपरा रूढ होत आहे. यंदा तिळगुळ किंमतीत चार ते पाच टक्के वाढ होऊनही महिलांनी मोठ्या आनंदाने खरेदी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पतंग बाजारात बच्चे कंपनीचीही धम्माल सुरू आहे.मकर संक्रांतच्या निमित्ताने शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी प्रचंड गर्दी दिसून आली. महिलांच्या आनंदाला जणू उधाण आले असून विविध वस्तूंच्या खरेदीला पाच दिवसांपासूनच खरेदीला वेग आल्याचे विविध वस्तु विके्रत्यांनी सांगितले. एकमेकांविषयी आस्था प्रगट करून सुसंवाद वाढविण्यासाठी घरोघरी जावून महिला वाण वाटतात. यामध्ये विविध वस्तूंचा समावेश असतो. बदल्या काळानुसार या सणातही नवे ट्रेंड निर्माण झाले आहेत. स्वयंपाक घरासाठी आवश्यक असलेल्या लहान-मोठ्या वस्तू देण्याची परंपरा सुरू होती. या परंपरेची व्याप्ती वाढत आहे.आता प्लॉस्टिक वस्तू वाणामधून बाद होत असून काळानुसार नव्या वस्तुंची मागणी वाढली. दुकानदारानांही नवनव्या वस्तूंची खरेदी करून दुकाने सजविली. सौंदर्य प्रसाधनापासून तर रूमालसारख्या उपयोगी वस्तूदेखील एकाच दुकानात मिळण्याची व्यवस्था बहुतांश विक्रेत्यांनी केल्याचे दिसून आले.कोल्हापुरी गुळाची चव लय भारी...संक्रांती निमित्ताने काही वर्षांपूर्वी घरीच तिळगुळ बनविले जात होते. धावपळीच्या जीवनात वस्तू तयार करायला आता उसंत नसल्याने बाजारातील खरेदीलाच पसंती देणे सुरू आहे. संक्रांतीसाठी किराणा दुकानदारांनी यंदा तीन प्रकारच्या गुळाचा साठा केला. त्यामध्ये अंकापल्ली, हिंदपुर व कोल्हापुरी गुळाचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकारचे गुळ चवदार असले तरी महिलांचा कल कोल्हापुरी गुळाकडे अधिक दिसून आला. या गुळातून तिळगुळ आणि विविध प्रकारचे चवदार व्यंजन करता येतात. त्यामुळे कोल्हापुरी गुळ अधिक प्रमाणात विकला जात आहे, अशी माहिती विक्रेते जे.बी. झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पांढरे तीळ महागलेपश्चिम महाराष्ट्रातून चंद्रपुरातील बाजाराज पांढऱ्यां तिळाची आवक होते. हे तीळ आरोग्याला पोषक असून उत्तम तेलही तयार करता येते. या तेलामध्ये प्रकृतीला निरोगी अन्नघटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, असा दावा दुकानदारांनी केला. गतवर्षी ८० ते ९० रुपये प्रति किलो दराने तीळ मिळत होते. सद्य:स्थितीत १२० ते १४० रुपये किलो दराने तिळाची विक्री सुरू आहे.गावरान बोरवाणामध्ये कुटुंबाला आवश्यक वस्तू भेट देताना त्यात ‘गावरान बोर’ हमखास असतो. ही परंपरा आजही कायम आहे. संकरीत टपोरे बोर खरेदी न करता आंबट व गावरान बोर आवडीने खरेदी केली जात आहे. बाजारात ३० रुपये पायली दराने गावरान बोराची विक्री सुरू आहे.उडती पतंग उडी उडी जाय...बालकांच्या आनंदाला उधाण आणणाऱ्या मकर संक्रांतीने पतंग खरेदीला वेग आणला. यावेळी बाजारामध्ये २०० पेक्षा अधिक प्रकारचे पतंग विक्रीकरिता उपलब्ध आहेत. दोन रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंत दर ठेवण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पतंगच्या दरात वाढ झाली नाही. कागद, सुत व अन्य प्लॉस्टिक किंमती जैसे-थे असल्याने किंमती वाढल्या नाहीत. शासनाने नायलॉन मांजा विक्रीला बंदी घातली. त्यामुळे विक्रेत्यांनी सुताचा मांजा दुकानात विक्रीकरिता उपलब्ध करून दिला. शहरातील गोल बाजारात पतंगची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत. विविध प्रकारचे पतंग बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असल्याने खरेदीसाठी बालकांची झुंबळ उडाल्याचे बाजारात दिसून येत आहे.